Sharad Mohol Murder Case One Accused Who Attacked As Been Revealed Earch For The Other Two Is Going On By Pune Police Maharashtra Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळवर (Sharad Mohol) हल्ला करणाऱ्या 3 आरोपींपैकी एका आरोपीचं निष्पन्न झालंय. साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर असे या आरोपीचे नाव आहे. पोळेकर याने त्याच्या इतर साथीदारांसह शरद मोहोळ याच्यावर शुक्रवार 5 जानेवारी रोजी पुण्यातील कोथरुड (Kothrud) भागात गोळीबार केला. त्यानंतर त्याला सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याचवेळी ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) देखील दाखल केले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. यामधील इतर दोन आरोपींचा शोध सध्या सुरु आहे. 

शरद मोहोळ कोथरुडमधील सुतारदरा या ठिकाणी जात असताना दुचाकीवरुन आलेल्या अज्ञातांनी त्याच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी शरद मोहोळ त्याच्या खांद्याला लागली. गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळवर कोथरुडमधीलच खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. पंरतु उपचारादरम्यान शरद मोहोळचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. 

कोण होता शरद मोहोळ? (who is Sharad Mohol)

ज्या मुळशी पॅटर्न चित्रपटाने पुण्यातील आणि मुळशी खोऱ्यातील गुन्हेगारीची जगताची ओळख झाली, त्याच मुळशी तालुक्यातील शरद मोहोळ होता. गुंड संदीप मोहोळचा ड्रायव्हर म्हणून शरद मोहोळ काम करत होता. मात्र, याच संदीप मोहोळची हत्या झाल्यानंतर तो गुन्हेगार म्हणून नावारुपास आला. शरदचे आई वडिल शेतकरी असून बेताच्या परिस्थितीत मोठा होऊनही गुन्हेगारीकडे वळला होता. 

गेल्यावर्षी तडीपारची कारवाई

गुंड शरद मोहोळवर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पिंटू मारणे हत्या प्रकरणात त्याला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. याप्रकरणात तो जामिनावर बाहेर आला. दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांचे अपहरण प्रकरणात त्याला पुन्हा अटक करण्यात आली. जुलै 2022 मध्ये शरद मोहोळला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले होते. 

कोथरुडमध्ये भीतीचं वातावरण 

कोथरुडमधील सुतारदरा या ठिकाणी घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी सुरु केली आहे. पूर्ववैमन्यास्यातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली होती. गोळीबार झाल्यानंतर कोथरुड परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय.

 

हेही वाचा : 

Gangster Sharad Mohol Shot Dead : दहशतवाद्याला जेलमध्ये गळा दाबून मारल्याचा आरोप ते 15 गंभीर गुन्ह्यांची नोंद; शरद मोहोळच्या अट्टल ‘गुंडगिरी’चा प्रवास कसा झाला?

[ad_2]

Related posts