T20 World Cup 2024 India Vs Pakistan Match Date Time Venue Team Squads Other Details

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Indian Cricket Team T20 World Cup 2024 Schedule : T20 विश्वचषक 2024 वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळवला जाईल. या स्पर्धेसाठी ICC ने वेळापत्रक जाहीर केलं आहे. भारतीय संघ या स्पर्धेतील पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. टीम इंडियाचा सामना 9 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानशी होणार असून, ही या स्पर्धेतील भारताची पुढील लढत असेल. टीम इंडिया ग्रुप स्टेजमध्ये एकूण 4 सामने खेळणार आहे. 1 जूनपासून टी-20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे.

2024 च्या T20 विश्वचषकाचा पहिला सामना कॅनडा आणि USA यांच्यात होणार आहे. विश्वचषकाचा अंतिम सामना 29 जून रोजी होणार आहे. स्पर्धेतील गट टप्प्यातील सामने 1 ते 18 जून दरम्यान खेळवले जातील. यानंतर 19 ते 24 जून दरम्यान सुपर-8 सामने होणार आहेत. त्यानंतर 26 आणि 27 जून रोजी उपांत्य फेरीचे सामने आणि 29 जून रोजी विजेतेपदाचा सामना खेळवला जाईल.

या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार असून त्यांची ‘अ’ ते ‘ड’ अशी पाच गटात विभागणी करण्यात आली आहे, म्हणजेच प्रत्येक गटात पाच संघ ठेवण्यात आले आहेत. भारतीय संघ अ गटात आहे. भारताशिवाय अ गटात पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा आणि अमेरिका यांचा समावेश आहे. भारतीय संघ ग्रुप स्टेजचे सर्व सामने यूएसएमध्ये खेळेल, ज्यामध्ये पहिले तीन सामने न्यूयॉर्कमध्ये आणि शेवटचे फ्लोरिडामध्ये होतील.

टी-20 वर्ल्ड कपमधील टीम इंडियाचे हे संपूर्ण वेळापत्रक

  • 5 जून रोजी भारत विरुद्ध आयर्लंड
  • 9 जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान
  • 12 जून रोजी भारत विरुद्ध अमेरिका
  • 15 जून रोजी भारत विरुद्ध कॅनडा 

वेस्ट इंडिजमध्ये बाद फेरीचे सामने होणार 

स्पर्धेचे बाद फेरीचे सामने म्हणजे उपांत्य फेरी आणि अंतिम सामने वेस्ट इंडिजमध्ये खेळवले जातील. 26 जून रोजी होणारा पहिला उपांत्य सामना गयाना येथे होणार आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच २७ जून रोजी त्रिनिदादमध्ये होणारी उपांत्य फेरी होणार आहे. त्यानंतर 29 जून रोजी होणारा विजेतेपदाचा सामना बार्बाडोसमध्ये होणार आहे. 2024 टी-20 विश्वचषक स्पर्धेत एकूण 55 सामने खेळवले जाणार आहेत. सर्व सामने वेस्ट इंडिज आणि यूएसएमधील 9 ठिकाणी होणार आहेत.

2024 च्या T20 विश्वचषकात एकूण 55 सामने खेळवले जाणार आहेत. विश्वचषक सामने वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये 9 ठिकाणी खेळवले जातील, ज्यामध्ये तीन अमेरिकन शहरे न्यूयॉर्क सिटी, डॅलस आणि मियामी विश्वचषक सामन्यांचे आयोजन करतील.

  • लीग स्टेज सामने – 1 ते 18 जून.
  • सुपर 8 सामने – 19 ते 24 जून.
  • उपांत्य फेरीचे सामने – 26 आणि 27 जून.
  • अंतिम सामना – 29 जून.

इतर महत्वाच्या बातम्या 

[ad_2]

Related posts