ED Arrest to Arvind Kejriwal know Net Worth of Delhi CM property house other asset Aam Aadmi Party Lok Sabha Election 2024 Political Updates in Marathi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ED Action On Delhi CM Arvind Kejriwal: नवी दिल्ली : कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी (Liquor Scam Case) ईडीकडून (ED) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal Arrest) यांना गुरुवारी रात्री ईडीनं (ED) अटक केली. रात्री उशिरा त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. आज त्यांना PMLA कोर्टात हजर केलं जाणार आहे. तसंच, आम आदमी पक्षाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात देखील सुनावणी होण्याची शक्यता आहे. मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल यांना ईडीनं नऊ वेळा समन्स बजावलं. मात्र ते एकदाही चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. 

दिल्ली हायकोर्टात त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र गुरुवारी हायकोर्टानं त्यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला. मग आम आदमी पक्षानं सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले. मात्र सुप्रीम कोर्टानं देखील रात्री उशिरा सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यानंतर ईडीचे अधिकारी आणि दिल्ली पोलीस केजरीवाल यांच्या घरी दाखल झाले, आणि संपूर्ण घराची झडती घेतली. तसंच, त्यांचा आणि त्यांच्या पत्नीचा फोन देखील ताब्यात घेतले. या फोन्समधला संपूर्ण डेटा ईडीनं आपल्या लॅपटॉपमध्ये ट्रान्सफर करून घेतला आहे. 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal Net Worth) यांच्या संपत्तीबद्दल बोलायचं तर त्यांची एकूण संपत्ती 3.44 कोटी रुपये आहे. रोख रकमेचा विचार केला तर त्यांच्याकडे केवळ 12 हजार रुपये आणि पत्नीकडे केवळ 9 हजार रुपये आहेत. त्यांच्या कुटुंबात 6 बँक खाती असून त्यात एकूण 33.29 लाख रुपये जमा आहेत. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर कोणत्याही प्रकारचं कर्ज नाही, अशी माहिती समोर आली आहे. 

40 हजार रुपये किमतीची चांदी आणि 32 लाख रुपये किमतीचं सोनं 

2020 च्या निवडणुकीवेळी केजरीवालांनी निवडणूक आयोगात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नीकडे 32 लाख रुपये किमतीचं 320 ग्रॅम सोनं आणि 40 हजार रुपये किमतीची एक किलो चांदी आहे. तर 15.31 लाख रुपये त्यांच्या पत्नीच्या नावावर म्युच्युअल फंडात जमा आहेत. केजरीवाल यांच्या नावावर कोणतंही वाहन नाही, मात्र त्यांच्या पत्नीच्या नावावर 6.20 लाख रुपयांची मारुती बलेनो गाडी आहे.

केजरीवालांकडे एक कोटींचं आलिशान घर

हरियाणातील गुरुग्राममध्ये अरविंद केजरीवाल यांच्या पत्नीच्या नावावर एक आलिशान घर आहे, जे त्यांनी 2010 मध्ये खरेदी केलं होतं. 2020 मध्ये त्या घराची किंमत अंदाजे 1 कोटी रुपये होती. हे घर खरेदी केलं तेव्हा त्याची किंमत 60 लाख रुपये होती. myneta.info नुसार, अरविंद केजरीवाल यांच्या नावावर गाझियाबाद आणि हरियाणामध्ये नॉन अॅग्रीकल्‍चर लँड आहे, ज्याची किंमत 2020 नुसार 1.77 कोटी रुपये आहे. 

केजरीवाल यांच्यावर कोणतंही कर्ज नाही

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर कोणत्याही प्रकारचं कर्ज नाही. त्यांनी कोणत्याही बँक किंवा फायनान्स कंपनीकडून वैयक्तिक कर्ज घेतलेलं नाही. याशिवाय, LIC आणि NSC, पोस्टल बचत किंवा विमा यांसारख्या इतर कोणत्याही सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक केलेली नाही. मात्र, त्यांच्या पत्नीच्या नावावर पीपीएफ खात्यात 13 लाख रुपये जमा आहेत. 51 वर्षीय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 1989 साली IIT खरगपूरमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये B.Tech ची पदवी घेतली आहे. तर दिल्लीतील चांदणी चौक हा त्यांचा मतदारसंघ आहे. त्यांच्या पत्नी निवृत्त सरकारी कर्मचारी आहेत. 

दिल्लीच्या उत्पादन शुल्क धोरण 2021-22 मधील कथित घोटाळ्यात मनी लाँड्रिंगची चौकशी करणाऱ्या ईडीनं आतापर्यंत मुख्यमंत्री केजरीवाल यांना 9 वेळा समन्स बजावलं आहे. ईडीनं सीएम केजरीवाल यांना गेल्या वर्षी 2 नोव्हेंबरला पहिलं समन्स धाडलं होतं. हे समन्स प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट (PMLA) अंतर्गत जारी करण्यात आलं आहे. हे प्रकरण सुमारे 100 कोटी रुपयांच्या दारू घोटाळ्याशी संबंधित असल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणात आतापर्यंत मनीष सिसोदिया, संजय सिंह आणि के. कविता यांना अटक करण्यात आली आहे.

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts