Whatsapp Ios Beta Users Can Now Choose The New Main Branding Color Of The App

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Whatsapp Colour Change : IOS बीटा टेस्टर्ससाठी व्हाट्सॲपने  (Whatsapp) एक नवीन फिचर आणलं आहे. या फिचरचा वापर करून युजर्स ॲपचा कलर आपल्या मनाने निवडू शकतात. यामध्ये कंपनीने पाच कलरचे ऑप्शन दिले आहेत. ते कलर कोणते आहेत आणि तो फिचर नक्की काय आहे? हे प्रश्न तुम्हाला पडला आहे का? चला तर जाणून घेऊया…

सोशल मीडियामध्ये नावाजलेली कंपनी Whatsapp आणि अनेक नवीन फिचर्सवर काम करत असते. पहिल्यांदा हे फिचर्स बीटा टेस्टरसाठी लागू केले जातात. यानंतर सामान्य माणसांसाठी हे फीचर्स आणले जातात. यामध्येच आता कंपनीने IOS बीटा टेस्टर यांच्यासाठी एक ‘थीम फीचर’ आणला आहे. याचा वापर करून युजर्स ॲपचा मेन कलर बदलू शकतात. अपीयरेंस सेक्शनमध्ये IOS युजर्सना हा फिचर मिळणार आहेत. यासाठी कंपनीने पाच कलर ऑप्शन दिले आहेत, ज्याच्यामध्ये ग्रीन, ब्लू, व्हाईट, पिंक आणि वायलेट या कलरचा समावेश करण्यात आला आहे. याच्यातील कोणता पण एक कलर तुम्ही ॲपच्या मेन कलरसाठी वापरू शकता. यामुळे व्हाट्सॲप आता एका नवीन लुकमध्ये तुमच्यासमोर येणार आहे. 

या अपडेटची माहिती व्हाट्सॲपच्या डेव्हलपमेंटवर नजर ठेवणारी वेबसाईट wabetainfor ने शेअर केली आहे. आता IOS 24.1.10.70 बीटा व्हर्जनमध्ये हा अपडेट आणला आहे. वेबसाईटनुसार, हा नवीन फीचर युजर्स ना आपल्या पर्सनॅलिटीला साजेल, असा ॲपचा कलर सेट करण्याचा ऑप्शन देतो. ज्यामुळे युजरचा एक्सपिरीयन्ससुद्धा बदलू शकतो. 

स्टेटस अॅप होणार अपडेट 

सोशल मीडिया प्लॅटफोर्म असणारी दिग्गज कंपनी व्हॉट्सअॅप सध्या एका नवीन फीचरवर काम करत आहे. स्टेटस टॅबमध्ये तुम्ही एखाद्याचे स्टेटस पाहता तेव्हा लवकरच तुम्हाला रिप्लाय बार दिसेल. सध्या अॅपमध्ये जेव्हा तुम्ही एखाद्याचे स्टेटस पाहता तेव्हा त्याला रिप्लाय देण्यासाठी तुम्हाला खाली दिसत असलेल्या रिप्लाय अॅरोवर क्लिक करावे लागते. पण लवकरच तुम्हाला रिप्लाय बारचा पर्याय बाय डिफॉल्ट मिळेल. म्हणजे तुम्हाला कुठेही क्लिक करण्याची गरज नाही. तुम्ही रिप्लाय बारमध्ये मेसेज टाइप करून त्या व्यक्तीला थेट उत्तर देऊ शकता. या अपडेटची माहिती व्हॉट्सअॅपच्या अपडेटवर लक्ष ठेवणाऱ्या Wabetainfo या वेबसाइटने शेअर केली आहे. व्हॉट्सअॅपच्या या फिचरमुळे अॅप वापरणं अधिक सोप होणार आहे. 

महत्वाच्या इतर बातम्या :

Facebook Feature: Facebook मध्ये आलं नवीन लिंक हिस्ट्री फीचर, कसं वापराल आणि काय आहेत फायदे? 

 

[ad_2]

Related posts