Amoled Display 4 Disadvantage Check Before Buying Smartphone Follow These Steps

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

AMOLED Display :  जर तुम्ही AMOLED Displayचा  स्मार्टफोन युज (Smartphone) करत असाल किंवा मग नवीन स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल तर आम्ही आज (New Phone)तुम्हाला काही टिप्स देणार आहोत. या टिप्समुळे (Tricks and Tips)स्मार्टफोन खरेदी करतेवेळी तुम्हाला मदत होऊ शकते. त्यासोबतच तुम्हाला AMOLED Display बाबतदेखील सांगणार आहोत. या डिस्प्लेबाबत आम्ही माहिती (Mobile AMOLED Display) तर देणारच आहोत मात्र या सोबतच यामुळे होणारे नुकसानसुद्धा सांगणार आहोत. 

बॅटरीचा अधिक वापर

AMOLED डिस्प्लेमुळे होणारे सगळ्यात मोठे नुकसान म्हणजे बॅटरीचा सगळ्यात जास्त वापर होतो. याच कारणाने तुम्हाला तुमचा स्मार्टफोन पुन्हा पुन्हा चार्ज करावा लागू शकतो. जर तुम्ही गेमिंग करत असाल तर यावेळी सुद्धा तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जाऊ लागू शकते. या कारणामुळे तुम्ही AMOLED डिस्प्लेचा फोन खरेदी करणे शक्यतो टाळले पाहिजे.

लाईफ

AMOLED पॅनल सोबतच तुम्हाला लाईफची समस्या देखील येऊ शकते.काही काळापूर्वी वन प्लसच्या युजर्सना अशा समस्या आल्या होत्या. डिस्प्लेमधील ब्राईटनेस कमी येणे ही अडचण त्यांना पुन्हा पुन्हा येत होती. या गोष्टींमुळे त्यांना भरपूर त्रासाला समोर जावं लागलं होतं. 

जास्त खर्च होतो

  AMOLED डिस्प्ले तयार करण्यासाठी भरपूर खर्च येतो. त्यामुळे हा डिस्ले असणारा फोनही महाग असतो. 

सूर्यप्रकाशात डिस्प्ले लो होतो

उन्हामुळे AMOLED डिस्प्ले लो  होऊ शकतो. हा यातील एक सगळ्यात महत्त्वाचा निगेटिव्ह पॉईंट ठरू शकतो. तुम्ही जर स्मार्टफोन खरेदी करत असाल तर ह्या गोष्टीचा आवर्जून विचार केला पाहिजे. 

या सगळ्या गोष्टी असल्या तरी AMOLED डिस्प्लेच्या अनेक डिव्हाईस अशा आहेत की ज्यामुळे तुम्हाला फायदा देखील होऊ शकतो. यामधून मिळणारी कॉलिटी हे खूप चांगली आहे.अर्थात तुम्हाला कलर्स खूप वेगळ्या प्रकारे पाहायला मिळू शकतात. यासोबतच यामध्ये टच खूप चांगला मिळतो. या आणि अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्ही स्मार्टफोन खरेदी करतेवेळी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

इतर महत्वाची बातमी-

Poco X6 Pro Launched Date : Poco X6 Pro मध्ये मिळणार HypherOS, कधी होणार लाँच, फिचर्स नेमके कोणते अन् किंमत किती असणार?

Increase Smartphone Battery Life  : फोनची बॅटरी 3 ते 4 तासात संपते? आजच ‘या’ सेटिंग्ज ऑन करा, तुम्हाला मिळेल दमदार बॅकअप

[ad_2]

Related posts