Rohit Sharma Funny DRS Video By ICC IND vs AUS WTC Final 2023 Watch Video; रिव्ह्यू कसा घ्यायचा रोहित शर्माकडून शिका… ICC ने घेतली हिटमॅनची फिरकी; VIDEO होतोय व्हायरल

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लंडन: ऑस्ट्रेलिया आणि भारत (AUS vs IND) यांच्यातील WTC फायनल २०२३ चा सामना लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवला जात आहे. टीम इंडियाची या सामन्याच्या पहिल्याच दिवशी चांगली सुरुवात झाली. सुरुवातीलाच टीम इंडियाला ३ विकेट्स मिळवण्यात यश आले. पण या दरम्यानच संघाचा कर्णधार रोहित शर्माने अशी एक अक्शन केली की खुद्द आयसीसीने त्याची मजा घेतली आहे. आयसीसीने त्याचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. आता टीम इंडियाच्या कर्णधाराचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.या सामन्यात (AUS vs IND) भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार म्हणून रोहित शर्मा आणि पॅट कमिन्स आमनेसामने आहेत.

रोहित शर्माची ICCने घेतली मजा

खरंतर ही घटना ऑस्ट्रेलियातील डावाची आहे. शार्दुल ठाकूरने १७व्या षटकातील चौथा चेंडू टाकला फलंदाज लबुशेनला टाकला होता. भारतीय खेळाडूंकडून जोरदार अपील करण्यात आले पण पंचांनी नकार दिला.

यानंतर शार्दुल ठाकूरने कर्णधार रोहित शर्माकडे डीआरएस घेण्याची मागणी केली. मात्र, येथे डीआरएस घेण्याची रोहितची पद्धत अशी होती की खुद्द आयसीसीलाही हसू आवरता आले नाही. साधारणपणे कर्णधार अंपायरसमोर डीआरएस घेतो आणि रिव्ह्यूसाठी संकेत देतो पण इथे रोहित गोलंदाजाकडे जाऊन त्याच्याशी चर्चा करत होता आणि नंतर पंचांकडे न बघताच पाठीमागे हात करून त्याने रिव्ह्यूसाठी इशारा केला.

त्याची डीआरएस घेण्याची शैली इतकी अनोखी होती की खुद्द आयसीसीलाही रोहित शर्माची मजा घेण्यापासून रोखता आले नाही. आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करताना आयसीसीने लिहिले की, ‘रिव्ह्यू कसा घ्यावा, रोहित शर्माकडून शिका.’ हा व्हिडिओ खूपच व्हायरल झाला आहे.


टीम इंडिया टेन्शनमध्ये

विशेष म्हणजे, WTC फायनल २०२३मध्ये लंचनंतर कांगारू टीम पुन्हा मजबूत अवस्थेत परतली, हे टीम इंडियासाठी चांगले लक्षण नाही. स्टीव्ह स्मिथ ट्रॅव्हिस हेड क्रिझवर कायम असून ते भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत आहेत. हेडने शतक तर स्मिथने अर्धशतक झळकावले आहे. सध्याच्या घडीला या दोघांनी २०० धावांची भागीदारी पूर्ण केली आहे.

रवी शास्त्रींनी गियरच बदलला… WTC Final मध्ये पोहोचल्यावर रोहितबद्दल काय म्हणाले पाहा…



[ad_2]

Related posts