बापलेक रेल्वे ट्रॅक ओलांडत असतानाच ट्रेनने दिली धडक, मग पुढे काय झालं पाहा…| father son crossing railway track Train Accident Viral Video trending news now

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Train Accident Viral Video : सोशल मीडियावर रेल्वे अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. थोड्याशा निष्काळजीपणामुळे आजपर्यंत असंख्य लोकांनी जीव गमावला आहे. धावती ट्रेन पडकणं किंवा उतरणं असो किंवा रेल्वे ट्रॅक ओलांडणे यामुळे अनेकांचे नाहक बळी गेले आहेत. वारंवार रेल्वे स्टेशनवर घोषणा करुनही लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि अतिआत्मविश्वास त्यांना नडतो. सोशल मीडियावर सध्या असाच एक रेल्वे अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (father son crossing railway track Train Accident Viral Video trending news now )

बापलेकीला ट्रेनने दिली धडक अन् मग…

सोशल मीडियावर व्हायरल झालेला धक्कादायक व्हिडीओ पाहून अंगावर शहारा येतो. या व्हिडीओमध्ये काही लोक रेल्वे प्लॅटफॉर्मवर चालताना तुम्हाला दिसून येतं असेल. तुम्ही पाहू शकता त्यांचा मागच्या बाजूने एक ट्रेन येतं आहे. पण अचानक एक व्यक्ती लहान मुलासोबत रेल्वे रुळ ओलांडला जातो अन् मग…

भयानक अपघाताचा व्हिडीओ 

या व्यक्तीच्या धानीमानी नसताना मागून येणाऱ्या रेल्वेने त्याला धडक दिली. या धडकेत तो व्यक्ती आणि चिमुकल्या दोघेही प्लॅटफॉर्मवर फेकल्या गेले. हे भयान दृश्यं पाहून तिथे असलेले व्यक्ती मदतीला धावले. त्यानंतर या दोघांचं काय झालं हे पुढे दाखविण्यात आलेलं नाही. 

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटर म्हणजे X वरील Idiots Caught In Camera या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या भयानक व्हिडीओला पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. 

हा व्हिडीओ पाहून नेटकरी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिलं आहे की, सर्वात वाईट गोष्ट म्हणजे एका मुलासोबत असताना हा अपघात झाला आहे. अनेकांना या व्हिडीओमधील कंमेट बॉक्समध्ये त्या मुलाचं काय झालं आणि त्या व्यक्तीच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. 

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून रेल्वे अपघाताच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. यापूर्वीही सोशल मीडियावर अपघाताचे असंख्य व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. पण सध्या सोशल मीडियावरील हा व्हिडीओ हृदयाचे ठोके चुकविणारा आहे. वारंवार सांगून आणि रेल्वे स्टेशनवर घोषणा होत असताना असा जीवाशी खेळ कितपत योग आहे? कायमचा उशीर होण्यापेक्षा थोडा उशीर झालेला कधीही चालेल. पण असं आपल्या पाठीमागे लोकांना रडत सोडणं बरोबर आहे का?

 

Related posts