Uddhav Thackeray Slams EKnath Shinde Mahayuti Government Maharashtra News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई :  भटकंती करायला गेलेल्यांना परत घरात घेणार नाही. अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray)  शिंदे गटांत गेलेल्यांना टोला लगावला आहे.  तसंच खोक्यात बंद झालेल्यांना खोक्यातून परत काढण्याची गरज नाही असंही ठाकरे म्हणाले. आज ठाकरे गटात पक्षप्रवेश पार पडला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी शिवसेनेतून (Shiv Sena)  बाहेर गेलेल्यांवर टीका केली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, भटकंती करायला गेलेल्यांना परत घरात घेणार नाही. खोक्यात बंद झालेल्यांना खोक्यातून परत काढण्याची गरज नाही. खोके घेणारे पक्ष, चिन्ह सगळ घेतलं तरी त्यांना स्वप्नात उद्धव ठाकरे दिसतो. उद्धव ठाकरे एकटा नाही. त्याच्यासोबत महाराष्ट्र आहे. आज जास्त बोलणार नाही, 23 तारखेला नाशिकला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा

23 तारखेला नाशिकला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे उद्धव ठाकरेंचे आवाहन

 उद्धव ठाकरे म्हणाले, आमच्याकडे शिवसैनिकांची माया प्रेम जिद्द हिम्मत आहे . तुम्ही परत आलात तुमचे स्वागत आहे. लढाई फार मोठी आहे. आपल्यासमोर खोके वाले आहेत. त्यांना उठता बसता त्यांना मीच दिसतो. 23 जानेवारीला नाशिकला कार्यक्रम जाहीर केला आहे. काळाराम मंदिरात जाणार आहे. काळाराम मंदिरात जाऊन रामाचे दर्शन घेणार आहोत. 23 तारखेला नाशिकला सर्वांनी या.

श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे  दौरा 

श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे  दौरा करणार आहे. 13 जानेवारी रोजी उद्धव ठाकरे कल्याण मतदारसंघात दौरा करणार आहे. विविध शाखांना उद्धव ठाकरे भेट देणार असून यावेळी पदाधिकाऱ्यांच्या बैठका पार पडणार आहे. 

आज फुटलेल्या पालवीचा मोठा महावृक्ष होणार : उद्धव ठाकरे 

शिवसेनेसारखं प्रेम दुसऱ्या कोणत्याच पक्षात मिळत नाही.  लढाई मोठी आहे, पण तुमच्यासारखे कट्टर शिवसैनिक एकवटले; तर ही लढाई सोपी आहे. बीडचे ‘निर्भीड’ शिवसैनिक पक्षात प्रवेश करत आहेत. आज फुटलेल्या पालवीचा उद्या बीडमध्ये महावृक्ष होणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.  

लवकरच राम राज्य येणार : उद्धव ठाकरे

मी  विरोधी पक्षाला आवाहन केले की तुम्ही तिन्ही निवडणुका घ्या. लोकसभा, विधानसभा आणि पालिका निवडणूका एकत्र लावा . गल्लीपासून दिल्लीपर्यंत काय आहे ते कळेल. लवकरच राम राज्य येणार आहे. 

हे ही वाचा :

Kiran Mane : अभिनेते किरण माने यांचा ठाकरे गटात प्रवेश; हाती शिवबंधन बांधत म्हणाले,” शिवसेना सर्वसामान्यांची आहे”

                 

[ad_2]

Related posts