India vs Australia WTC Final Match Live Score Updates Captain Rohit Sharma Video Goes Viral; लंडनमध्ये रोहितसोबत मोठी दुर्घटना होता होता टळली, कर्णधारपद सोडण्याची आलेली वेळ

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लंडन: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये हिटमॅन रोहित शर्माच्या खांद्यावर टीम इंडियाचा कर्णधारपदाची महत्त्वाची जबाबदारी आहे. लंडनच्या ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात त्याने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र, त्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, जो पाहून प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याला धडकी भरेल.

नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा इंडियन टीमचा निर्णय

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC Final-2023) च्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारतीय चाहत्यांना १० वर्षांनंतर ICC ट्रॉफी जिंकण्याची आशा आहे. टीम इंडियाने २०१३ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.

क्रिकेटच्या जगतात इतिहास रचणार Virat Kohli, WTC फायनलमध्ये ‘या’ महाविक्रमाच्या एक पाऊल जवळ
लंडनमध्ये मोठा अपघात टळला

दरम्यान, रोहित शर्माशी संबंधित एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो ओव्हल मैदानावर येण्यासाठी पायऱ्या उतरत आहे. या दरम्यान, त्याचा पाय घसरता घसरता वाचतो. रोहितचा तोल जरा गेला असता तर तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. एवढेच नाही तर टीम इंडियाला अचानक कर्णधारही बदलावा लागला असता. मात्र, सुदैवाने रोहितला काहीही झाले नाही.

विराट कोहली आणि गौतम गंभीर मैदानातच भिडले; मोठी बाचाबाची, व्हिडिओ व्हायरल

२८९ धावांत ३ विकेट

प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाने आतापर्यंत ३ विकेट गमावून २८९ धावा केल्या आहेत. ट्रेविस हेडने शतक झळकावलं असून सध्या तो १२४ धावांवर खेळत आहे. तर स्टीव्ह स्मिथ हा सध्या ७९ धावांसह खेळतो आहे.

Odisha Train Accident: कोरोमंडलचा एक डबा झुडपात जाऊन उलटला, तो तिथेच अडकून पडला, ४८ तासांनी अखेर…

[ad_2]

Related posts