6 killed in train accident, ओडिशात आणखी एक अपघात, ट्रेनच्या धडकेने ६ मजूर ठार, पाऊस आल्याने मालगाडीखाली घेतला आसरा – odisha train accident 4 laborers lost lives and 3 injured in jajpur road railway accident

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

भुवनेश्वर : ओडिशातील जाजपूर रोड रेल्वे स्थानकावर बुधवारी मालगाडीने ७ मजुरांना धडक दिली. या अपघातात ६ मजुरांचा मृत्यू झाला तर दोन मजूर गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अतिवृष्टीपासून वाचण्यासाठी या मजुरांनी उभ्या असलेल्या मालगाडीखाली आसरा घेतला होता. त्यानंतर अचानक मालगाडी सुरू झाली आणि मजुरांना त्याखालून बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही.या अपघाताबाबत रेल्वे प्रवक्त्याने माहिती देताना सांगितले की, तेथे अचानक वादळ सुरू झाले. मालगाडी उभी असलेल्या शेजारील रेल्वे मार्गावर मजूर काम करत होते. त्यांनी त्याखाली आश्रय घेतला, परंतु दुर्दैवाने इंजिन नसलेली मालगाडी पुढे जाऊ लागली ज्यामुळे अपघात झाला. यामुळे मजुरांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. जखमींना कटक येथील एससीबी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सोयाबीनच्या हमीभावात मोठी वाढ; पाहा कोणत्या पिकाला किती मिळाला हमीभाव
बालासोर येथे ५ दिवसांपूर्वी भीषण रेल्वे अपघात झाला होता.

ईस्ट कोस्ट रेल्वेने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, रेल्वेच्या कामासाठी कंत्राटदाराने कामावर घेतलेल्या कंत्राटी मजुरांनी वादळ आणि पावसापासून संरक्षण मिळण्यासाठी जाजपूर केओंझार रोड (स्टेशन) जवळ एका पार्क केलेल्या डब्याखाली आश्रय घेतला.

RBI उद्या करणार मोठी घोषणा, EMI भरणाऱ्यांना दिलासा मिळणार की बोजा वाढणार?, वाचा संपूर्ण तपशील
प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वादळामुळे थांबलेले डबे इंजिनाशिवाय धावू लागले आणि हा अपघात झाला. ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात झालेल्या भीषण रेल्वे अपघाताच्या पाच दिवसानंतर ही घटना घडली आहे. ओडिशा रेल्वे अपघातात २८८ लोकांचा मृत्यू झाला आहे.
WTC Final : शमीच्या मास्टर प्लॅनमध्ये असा अडकला मार्नस लॅबुशेन, जगातील अव्वल फलंदाजाची दांडी गूल

[ad_2]

Related posts