Raj Thackeray On Marwadi Gujrati Marathi Natya Sammelan Abp Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Raj Thackeray : गुजराती, मारवाडी इथे का आले? नाट्य संमेलनातून राज ठाकरेंचा सवाल

पुणे: जगाचा इतिहास हा भूगोलावर अवलंबून आहे, सर्व वाद हे जमिनीसाठी होतात, महाराष्ट्राचा भूगोल हा धोक्यात आहे, इथल्या जमिनी विकत घेऊन महाराष्ट्राचं अस्तित्व संपवलं जात आहे असं वक्तव्य मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलं. याची सुरूवात रायगडपासून होणार असून न्हावा शेवा शिवडी सीलिंकमुळे (Nhava Sheva Atal Setu) रायगडचं वाटोळं होणार असल्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला. ते मराठी नाट्य संमेलनामध्ये बोलत होते. 

राज ठाकरे म्हणाले की, जगाचा इतिहास हा भूगोलावर म्हणजे जमिनीवर अवलंबून आहे. आतापर्यंत सर्व आक्रमकांनी जमिनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भूगोल काबिज करण्यासाठी जो संघर्ष आहे त्याला इतिहास म्हटलं जातंय. आज महाराष्ट्राचा भूगोल अडचणीत आहे. तो अतिशय हुशारीने विकत घेतला जात आहे. महाराष्ट्रातल्या जनतेचं अस्तित्व संपवलं जाण्याचा प्रयत्न केला जात आहे.

[ad_2]

Related posts