Indian Players May Misses T20 World Cup 2024 Due To Rohit And Virat Comeback In T20i

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

T20 World Cup 2024 :  आगामी टी 20 विश्वचषक डोळ्यासमोर ठेऊन टीम इंडियाची अफगाणिस्तानविरोधात (IND vs AFG T20I) निवड करण्यात आली आहे. 16 सदस्य संघामध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी कमबॅक केलेय. विराट आणि रोहित यांनी मागील वर्षभरापासून टी 20 क्रिकेटपासून फारकत घेतली होती होती. पण आता या दोन्ही दिग्गजांचं कमबॅक खूप काही सांगून जातेय. 

टी 20 क्रिकेटमध्ये रोहित आणि विराट खेळताना दिसणार नाहीत, असा अंदाज गेल्या काही दिवसांपासून बांधला जात होता. त्यामुळे टी 20 संघात या दोन्ही खेळाडूचं कमबॅक झाल्यामुळे चर्चा सुरु झाली आहे. यामागे अनेक कारणं, असल्याचं सांगितलं जातेय. रोहित शर्माच्या नेतृत्वावर, विराट कोहलीच्या स्ट्राइक रेटवर आणि युवा खेळाडूंना संधी मिळायला हवी, त्यामुळे विराट आणि रोहित फक्त कसोटी आणि वनडे पर्यंत मर्यादीत राहतील, अशा चर्चा होत्या. पण आता या चर्चा फेल ठरल्या आहेत. निवड समितीने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना टी 20 क्रिकेटमध्ये सामील करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 

आगामी टी 20 विश्वचषकात रोहित शर्मा संघाची धूरा संभाळेल, असा कयास लावला जातोय. विराट कोहलीचेही संघातील स्थान निश्चित मानले जातेय. अशा स्थितीत या दोन दिग्गजांमुळे कोण कोणत्या खेळाडूंचं टी 20 वर्ल्डकपमधील स्थान धोक्यात आलोय… याचीही चर्चा सुरु झाली आहे. अफगाणिस्तानविरोधातील टी 20 मालिकेतून या प्रश्नाचं उत्तर मिळणं कठीण आहे. आयपीएल 2024 पर्यंत या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील. तरीही विराट आणि रोहित यांच्या कमबॅकमुळे टी 20 विश्वचषकात कुणाचा पत्ता कट होऊ शकतो.. याबाबत पाहूयात… 

श्रेयस अय्यर : 

श्रेयस अय्यर टीम इंडियासाठी वनडे आणि कसोटीतील महत्वाचा सदस्य आहे. पण टी 20 क्रिकेटमध्ये त्याला अद्याप प्रभाव पाडता आलेला नाही. रोहित आणि विराटच्या कमबॅकमुळे अय्यरचं संघातील स्थान धोक्यात आलेय. विराट कोहली तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला उतरणार, त्यामुळे अय्यरसाठी स्थान मिळणं कठीण आहे. सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला असतील. अशा स्थितीत टी20 विश्वचषकात श्रेयस अय्यरला स्थान मिळण्याची शक्यता कमीच आहे. 

केएल राहुल :

वर्ल्ड कप 2023 मध्ये केएल राहुल याने फलंदाजीशिवाय विकेटकिपर म्हणूनही प्रभावी कामगिरी केली आहे. राहुलने मोक्याच्या क्षणी भारताला विजय मिळवून दिलाय. पण विश्वचषक 2023 फायनलमध्ये राहुलचू संथ फलंदाजी चर्चेत होती. टी 20 क्रिकेटमध्येही केएल राहुलने अनेकदा संथ फलंदाजी केली, त्याचा स्ट्राइक रेट नेहमीच चर्चेत राहिलाय. अशा स्थितीत यंदाच्या टी 20 विश्वचषकात केएल राहुल खेळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळेच अफगाणिस्तानविरोधात केएल राहुल याला संघाबाहेर ठेवलेय. आयपीएलमध्ये केएल राहुलने शानदार कामगिरी केली अन् अफगाणिस्तानविरोधात जितेश शर्मा आणि संजू फ्लॉप गेल्यास केएल राहुलला तिकिट मिळू शकते.  

ईशान किशन :

ईशान किशनही खराब स्ट्राइक रेटमुळे टी20 वर्ल्ड कपला मुकण्याची शक्यता आहे. ईशान किशन याला विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखलं जातं, पण गेल्या काही सामन्यात त्याला प्रभावी कामगिरी करता आली नाही. ईशान किशन याला आयपीएलमध्ये शानदार कामगिरी करावी लागणार आहे, त्याशिवाय दुसरीकडे अफगाणिस्तानविरोधात संजू आणि जितेश फ्लॉप गेले, तर त्याचे टी 20 वर्ल्डकपसाठी दरवाजे उघडतील. 

यशस्वी-तिलक आणि रिंकू यांचं स्थान निश्चित ?

यशस्वी जायस्वाल, तिलक वर्मा आणि रिंकू सिंह गेल्या काही टी 20 सामन्यात शानदार कामगिरी केली आहे. अफगाणिस्तानविरोधातही त्यांना संधी मिळाली आहे. या तिन्ही खेळाडूंनी आपल्या कामगिरीत सातत्य ठेवल्यास टी 20 विश्वचषकातील त्यांचं स्थान निश्चित मानले जातेय. अशा स्थितीमध्ये केएल राहुल, ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यासारख्या दिग्गजांना टी 20 मध्ये प्रवेश मिळणं कटीण आहे. फलंदाजीमध्ये भारताकडे रोहित शर्मा, यशस्वी जायस्वाल, विराट कोहली, शुभमन गिल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंह, हार्दिक पांड्या आणि रविंद्र जाडेजा यासारखे पर्याय असतील. 

[ad_2]

Related posts