Wasim Akram Got Angry At A Pakistani Fan Cricket News Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Wasim Akram : पाकिस्तानचा माजी डावखुरा गोलंदाज वसीम अक्रम सोशल मीडियावर अॅक्टीव असतो. अनेक वेळा तो चाहत्यांनी केलेल्या कमेंट्सला देखील उत्तरे देत असतो. मात्र, आता चाहत्यांना वसीम अक्रमचे वेगळेच रुप पाहायला मिळालय. एका चाहत्याने केलेल्या कमेंटवर वसीम अक्रम चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला आहे. त्याने इंन्स्टाग्राम पोस्टवर चाहत्याला दिलेला रिप्लाय सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. चुकीच्या पद्धतीने कमेंट्स करणाऱ्या लोकांना वसीम अक्रमने चोख प्रत्युत्तर दिलय. 

नेमकं काय घडलं?

वसीम अक्रमने इन्स्टाग्रावर एक फोटो पोस्ट केला होता. यावर एका पाकिस्तानी चाहत्याने वाईट पद्धतीने कमेंट केली. चाहत्याने लिहिले की, “पहिले बगल के बाल काट” चाहत्याच्या या कमेटवर वसीम अक्रम चांगलाच भडकला. त्याने या चुकीच्या पद्धतीने कमेंट्स करणाऱ्या व्यक्तीला चोख प्रत्युत्तर दिले. वसीम अक्रम म्हणाला, जग चंद्रावर पोहोचली आहे. मात्र,स माझ्या देशातील काही मुर्ख लोक काखेतील केसांबद्दल बोलत आहेत. यावरुन आपल्याला समजते की, आपण कोठे आहोत आणि आपली संस्कृती कोठे आहे. 

जगातल्या टॉप गोलंदाजांपैकी एक 

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम हा जगातील टॉप गोलंदाजांपैकी एक होता. त्याच्या स्विंगने अनेकांना क्रिजवर नाचवले होते. सध्या तो समालोचन करण्यामध्ये वेळ घाततो. अनेदा त्याने प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे. वसीम अक्रमने 356 सामने खेळत 502 विकेट्स पटकावल्या. 15 धावा देत 5 विकेट्स ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती. त्याने वनडेमध्ये सहावेळा 5 विकेट्स घेतल्या. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 414 विकेट्स पटकावल्या. सध्या तो अनेक सामन्यांमध्ये समालोचक म्हणून जबाबदारी पार पाडत असतो. 

टीम इंडियाकडे पाकिस्तानला चीतपट करण्याची संधी; टी20 वर्ल्डकपमध्ये कधी भिडणार दोन्ही संघ?

गतवर्षात एकदिवसीय विश्वचषकात (T20 World Cup 2024) कांगारूंनी टीम इंडियाचा (Team India) पराभव केला अन् देशातील 140 कोटी जनतेच्या भावनांचा चक्काचूर झाला. पण, यंदाच्या नव्या वर्षात गेल्या वर्षाची जखम भरुन काढण्याची टीम इंडियाकडे मोठी संधी आहे. 2024 मध्ये टी20 विश्वचषक (World Cup 2024) पार पडणार आहे. त्यामुळे या नव्या वर्षात भारतीय क्रिकेट संघाला आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. यावर्षी आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 जूनमध्ये खेळवला जाणार आहे. टी20 विश्वचषकाचं वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सूत्रांच्या हवाल्यानं भारतीय क्रिकेट संघाचं टी20 वर्ल्डकपमधील शेड्यूल समोर आलं आहे. या शेड्युलनुसार, टी20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा पहिला क्रिकेट सामना 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध खेळवला जाणार आहे. तर दुसरा सामना 9 जून रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळवला जाऊ शकतो. तिसरा सामना 12 जूनला अमेरिकेविरुद्ध होणार आहे. हे तीन सामने न्यूयॉर्कमध्ये होणार आहेत. दरम्यान, टी-20 विश्वचषक 2024 वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळवला जाणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादव अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेला मुकला, पण झटका मुबंई इंडियन्सला! आता नवीन आजाराने किती महिने मुकणार?

[ad_2]

Related posts