( प्रगत भारत । pragatbharat.com)
Vaginal Discharge : अनेक महिलांना Vaginal Discharge म्हणजेच व्हाईट डिस्चार्जची (White Discharge) तक्रार करतात. योनीमार्गातून (Vagina) येणाऱ्या पांढऱ्या स्रावामुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. काही प्रकरणांमध्ये, पांढरा स्त्राव सामान्य असतो आणि काही प्रकरणांमध्ये हा स्राव होणं आरोग्याच्या समस्यांचं संकेत देतो. अनेकदा यीस्ट इंफेक्शन (Infection), अस्वच्छता यामुळे पिरीयड्सपूर्वी व्हाईट डिस्चार्ज (White Discharge) होण्याची शक्यता असते. असं होत असल्यास महिलांनी याकडे दुर्लक्ष न करता उपचार करून घ्यावे.
व्हाइट डिस्चार्ज होण्याची कारणं (Vaginal discharge Causes)
बॅक्टेरियल इन्फेक्शन (Bacterial Infection)
अनेकदा बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे पिरीयड्सपूर्वी व्हाईट डिस्चार्ज होण्याची शक्यता असते. बॅक्टेरियल इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी महिलांना स्वच्छता बाळगणं फार गरजेचं आहे. गरज भासल्यास डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावेत.
व्हिटॅमिन कमतरता
व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळेही ही तक्रार महिलांमध्ये उद्भवू शकते. ही समस्या टाळण्यासाठी तुमच्या आहारात फायबरचा समावेश करावा. ज्यामध्ये तुम्ही ताजी फळं आणि भाज्यांचं सेवन करू शकता.
यीस्ट इन्फेक्शन
यीस्ट इन्फेक्शनची लक्षणं दिसू लागल्यावर पिरीयड्पूर्वी व्हाईट डिस्चार्ज होऊ शकतो. यावेळी तातडीने डॉक्टरांशी बोलून उपचार घ्यावेत
ताणतणाव (Stress)
अनेक महिलांमध्ये व्हाईट डिस्चार्जचं कारण हे ताणतणाव देखील असू शकतं. ताणतणाव दूर करण्यासाठी तुम्ही ब्रीदींग एक्सरसाईज, योगा आणि मेडिटेशनची मदत घेऊ शकता.
डॉक्टरांची मदत केव्हा घ्यावी
कधीकधी योनीमार्गातून होणारा डिस्चार्ज हे संसर्ग असल्याचा संकेत असू शकतो. जर डिस्चार्ज असामान्यपणे पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचा असेल, चिकट असेल किंवा दुर्गंधी असेल तर ते इन्फेक्शनचं लक्षण असू शकतो.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, योनीमार्गात खाज येत असेल किंवा जळजळ जाणवत असेल तर हे यीस्ट संसर्ग किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे होऊ शकतं. जर तुम्हाला असामान्य दिसणारा किंवा दुर्गंधी असलेला कोणताही स्त्राव दिसला तर त्यावेळी सर्वप्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या.