businessman ratan tata will give special gifts to lakshadweep big announcement

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Lakshadweep Tourisum : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट आणि मालदीव वादानंतर लक्षद्वीप  (Lakshdweep) बेट चांगलंच चर्चेत आलं आहे. येत्या काळात लक्षद्वीप पर्यटकांसाठी महत्त्वाचं ठिकाण बनणार आहे. लक्षद्वीपला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी अनेक सुविधा उभारण्याची गरज आहे. अशात उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांनी लक्षद्वीपला एक खास भेट देण्याची घोषणा केली आहे. टाटा ग्रुपची (Tata Group) इंडियन हॉटेल्स कंपनी लक्षद्वीपमधअये दोन ताज-ब्रँडेड रिसॉर्ट सुरु करणार आहे. हा प्रोजेक्ट 2026 मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. हे दोन्ही हॉटेल्स आयएचसीएलतर्फे (IHCL) विकसित केले जाणार आहेत. विशेष म्हणजे गेल्या वर्षी जानेवारी महिन्यातच टाटा ग्रुपच्यावतीने लक्षद्वीपमध्ये ताज ब्रँडेड हॉटेलची घोषणा करण्यात आली होती. लक्षद्वीपमधल्या सुहेली आणि कदमत बेटांवर ही हॉटेल्स सुरु केली जाणार आहेत. 

पीएम मोदी यांनी लक्षद्वीपमधल्या पर्यटनाचे फोटो शेअर केल्यानंतर संपूर्ण जगाचं लक्ष लक्षद्वीपकडे वळलं आहे. लक्षद्वीपची तुलना मालदीवशी केली जात असून इथले समुद्रकिनारे मालदीवपेक्षाही सुंदर असल्याचं भारतीयांचं म्हणणं आहे. सध्या लक्षद्वीपमध्ये विविध सुविधा आणि पर्यटकांसाठी चांगली हॉटेल्स आणि रिसॉर्टची संख्या वाढण्याची गरज आहे. 

लक्षद्वीपमध्ये कोणती पर्यटन स्थळ आहेत?
36 बेटांनी व्यापलेल्या लक्षद्वीपमध्ये बंगाराम, अगत्ती, कदमथ, मिनिकॉय, कवरत्ती आणि सुहेली ही पर्यटनस्थळ प्रसिद्ध आहेत. कदमथमध्ये भारतातील सर्वोत्तम मानलं जाणांर डायविंग सेंटर आहे. आयएचसीएलचे एमडी आणि सीईओ पुनीत चटवाल यांनी गेल्या वर्षी लक्षद्वीपमध्ये रिसॉर्ट सुरु करण्याच्या करारावर हस्ताक्षर केले होते. जागतिक दर्जाची दोन हॉटेर्स जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतील असा विश्वास पुनीत चटवाल यांनी व्यक्त केलाय.

कशी असणार हॉटेल्सची सुविधा?
सुहेली बेटावरील हॉटेलमध्ये 110 रुम्सबरोबर 60 विला आणि 50 वॉटर विला असणार आहेत. तर कदमथ बेटावरील हॉटेलमध्ये 110 रुम्सबरोबर 75 बीच विला आणि 35 वॉटर विला असणआर आहेत. स्कूब डायविंग, विंडसर्फिंग, स्नोर्केलिंग, सर्फिंग, वॉटर स्कीईंगसह अनेक वॉटर स्पोर्ट्स लक्षद्वीपमध्ये पर्यटकांना आकर्षित करतात. 

पंतप्रधान मोदी यांचं ट्विट
4 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिली होती. यानंतर त्यांनी एक ट्विट केलं होतं. आपल्या ट्विटमध्ये पीएम मोदी यांनी लक्षद्वीपचं कौतुक केलं होतं. लक्षद्वीपच्या आश्चर्यजनक सौंदर्यामुळे आपण आश्चर्यचकीत आहोत, नैसर्गिक सुंदरतेशिवाय लक्षद्वीपमधली शांतता मंत्रमुग्ध करणारी आहे असं पीएम मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. 

Related posts