How To Easily Add Music To Instagram Posts Increase Followers

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Instagram Tips : इंस्टाग्रामवर नवनवे फिचर्स सुरु करण्यात आले आहे ते वापरुन तुम्ही पोस्ट करु शकता आणि (Instagram)  ज्याचा वापर करून तुम्ही तुमचे फॉलोवर्स वाढवू शकता. म्यझिक अॅड करणं किंवा टेम्पेट वापरणं हे फिचर पोस्टसाठी कंपनीने ॲपमध्ये अॅड केला आहे. ते फिचर यापूर्वी स्टोरीमध्येच वापरता येत होतं आता मात्र पोस्टसाठीदेखील वापरता येणार आहे. त्यासोबतच अनेक फिचर्स आहेत ते वापरुन तुम्ही फॉलोअर्स वाठवू शकणार आहात.

म्युझिक अॅड करा

आम्ही ज्या फिचरबद्दल बोलत आहोत ते फिचर म्हणजे पोस्टमध्ये म्युझिक अॅड करणे. इंस्टाग्रामने या फिचरला गेल्या वर्षी लाँच केलं आहे. याचा वापर करून तुम्ही पोस्टला अजून जास्त अपिलिंग बनवू शकता. उदाहरण म्हणून जर तुम्ही ट्रॅव्हलच्या संबंधी काही पोस्ट करत असाल तर तुम्ही ट्रेडिंग हॅशटॅग सोबतच ट्रॅव्हल्ससंबंधित कोणतेही पॉप्युलर गाणं पोस्ट करू शकतात. यामुळे तुमचे फॉलोअर्स वेगाने वाढतील. 

तुमच्या पोस्टवर म्युझिक अॅड करण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला फोटो सिलेक्ट केले पाहिजेत. यानंतर नेक्स्ट बटन वर क्लिक केल्यावर वरच्या कोपऱ्यात तुम्हाला म्युझिकचा आयकॉन दिसेल ,त्यावर क्लिक केल्यावर तुम्ही तुमचं आवडीचं गाणं निवडू शकता.

हे म्युझिक निवडल्यानंतर तुम्ही त्या गाण्यातील एखादा खास पॅरा सिलेक्ट करू शकतात. कंपनी तुम्हाला 90 सेकंदाची म्युझिक निवडण्याची सुविधा देते. यानंतर पोस्ट या बटन वर क्लिक करावे लागते. पोस्ट झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या फोटोसोबत म्युझिक ऐकू येईल. 

प्रोफाइल पब्लिक करा

जर तुम्हाला तुमच्या इंस्टाग्रामवर फॉलोवर्स वाढवायचे असतील तर त्यासाठी तुमची प्रोफाइल पब्लिक असणे खूप गरजेचे आहे. प्रायव्हेट अकाउंट मध्ये तुम्हाला रीच जास्त मिळणार नाही. जास्त फॉलोवर्स असल्याने तुम्हाला ब्रँड प्रमोशन ,डिल्स आणि अशा अनेक गोष्टींचा फायदा घेता येतो. अशा पद्धतीने तुम्ही पैसे देखील कमवू शकतात. 

टेम्प्लेट वापरा

हल्लीच इंस्टाग्रामने स्टोरी मध्ये एक नवीन फिचर यूजर्सना दिला आहे. आता तुम्ही तुमचं मनपसंत टेम्प्लेट बनवू शकता. हे टेम्प्लेट बनवण्यासोबतच तुम्ही तुमच्या मित्रांना सुद्धा ते शेअर करू शकतात आणि त्यांना एडिट करण्यासाठी ऑप्शन पण देता येतो. तुम्ही Happy journey,Happy sunday अशा पद्धतीचे अनेक टेम्पलेट डिझाईन करू शकतात. 

इंस्टाग्राम कायमच असे वेगवेगळे फिचर्स आपल्या युजर्ससाठी आणत असते. ज्याचा वापर करून आपण आपले फॉलोवर्स वाढवू शकतो, आपली प्रोफाइल खूप चांगले बनवू शकतो. अर्थात या गोष्टींचा योग्य रीतीने अभ्यास केल्यावर याच्यातून किंवा ब्रँड प्रमोशन्स मधून आपण पैसे देखील कमवू शकतो.

इतर महत्वाची बातमी-

Instagram Reel Voice : Instagram च्या सर्वात लोकप्रिय AI व्हॉईसवर रील्स कसे तयार कराल? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस!

 

 

[ad_2]

Related posts