Shiv Sena MLA Disqualification Case Final Result Today By Maharashtra Vidhan Sabha Speaker Rahul Narwekar Verdict Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Shivsena MLA Political Crisis Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shiv Sena MLA Disqualification Case :  महाराष्ट्रासह संपूर्ण देशभराचे लक्ष लागून असलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेचा (Shiv Sena MLA Disqualification Case) निकाल आज सुनावण्यात येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar)  हे आज निकाल जाहीर करतील. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास निकाल येणे अपेक्षित आहे. जवळपास दीड वर्षांपूर्वी शिवसेनेत पडलेल्या अभूतपूर्व फुटीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. 

शिवसेना ठाकरे गटाकडून व्हीप आदेश मोडल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह 16 आमदारांवर अपात्रतेची याचिका दाखल केली. सुप्रीम कोर्टात जवळपास वर्षभराच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात काही गोष्टी स्पष्ट करत विधानसभा अध्यक्षांना अपात्रतेचा सुनावणी घेऊन निकाल देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर, आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज निकाल सुनावणार आहेत. 

तीन महिने विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी 

विधानसभा अध्यक्षांसमोरील सुनावणी अखेर तीन महिन्यानंतर  पूर्ण झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद, याचिका एकत्रित करणे, त्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटांच्या आमदारांची उलट तपासणी घेऊन साक्ष नोंदवणे आणि अंतिम सुनावणीतील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद असं करत ही सुनावणी पूर्ण करण्यात आली. 

या उलटतपासणी दरम्यान ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची साक्ष नोंदवण्यात आली. शिंदे गटाचे वकील अॅड. महेश जेठमलानी यांनी प्रभू यांनी व्हीप बजावलाच नाही, सगळा बोगस कारभार असल्याचे सिद्ध करण्याचे प्रयत्न केले. 

सुनील प्रभू यांच्या उलट तपासणीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि खासदारांच्या उलट तपासणीला सुरुवात करताना प्रश्नांचा भडीमार केला. शिवसेना शिंदे गटाने महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा डाव आखला होता आणि हा एक नियोजित राजकीय कट होता हे रेकॉर्डवर आणण्याचा आपल्या प्रश्नांमध्ये रेकॉर्डवर आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि तशा प्रकारची प्रश्न शिंदे गटाच्या आमदार खासदारांना विचारले. 

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकालात हे असू शकतात ठळक मुद्दे…

–  एकूण 34 याचिकांचे 6 गटात समावेश करून ही सुनावणी पार पडली. त्यानुसार, सहा गटांत निकाल वाचला जाईल

– सुमारे 200 पानांचा एक निकाल असून सहा गटांचा मिळून सुमारे 1200 पानांचे निकाल पत्र तयार करण्यात आले आहे. 

– परिणामी, सहा गटांतील निकालाचा सारांश केवळ वाचला जाईल. याउलट संपूर्ण निकालाची प्रत ही दोन्ही गटांना पाठवली जाईल. 
 
– पक्षांतर बंदी कायद्याची स्पष्टता आणि नेमकी व्याख्या या प्रकरणाच्या निकालानंतर स्पष्ट होईल.

– सर्वोच्च न्यायालयाच्या या प्रकरणातील मर्यादा स्पष्ट होतील. 

– अशा प्रकरणांमधील अध्यक्षांची कार्यकक्षा आणि अधिकार हे स्पष्ट होतील.

– राजकीय पक्ष व विधीमंडळ पक्ष यांच्या कार्यकक्षा स्पष्ट होतील.

>> अपात्रतेची टांगती तलवार असणारे दोन्ही गटातील आमदार

शिवसेना शिंदे गट 16 आमदार 

1) एकनाथ शिंदे 
2) चिमणराव पाटील
3) अब्दुल सत्तार
4) तानाजी सावंत
5) यामिनी जाधव 
6) संदीपान  भुमरे
7) भरत गोगावले
8) संजय शिरसाठ 
9) लता सोनवणे
10) प्रकाश सुर्वे
11) बालाजी किणीकर
12) बालाजी कल्याणकर
13) अनिल बाबर
14) संजय रायमूळकर
15) रमेश बोरनारे
16) महेश शिंदे

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार

1) अजय चौधरी
2) रवींद्र वायकर
3) राजन साळवी
4) वैभव नाईक
5) नितीन देशमुख
6) सुनिल राऊत
7) सुनिल प्रभू
8) भास्कर जाधव
9) रमेश कोरगावंकर
10) प्रकाश फातर्फेकर 
11) कैलास पाटिल
12) संजय पोतनीस
13) उदयसिंह राजपूत
14) राहुल पाटील

[ad_2]

Related posts