Taxi Rickshaw Drivers Strike In Chhatrapati Sambhaji Nagar Support To Hit And Run Law Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

छत्रपती संभाजीनगर : नवीन वाहन कायदा विरोधात ट्रक चालकांनी (Truck Driver) पुकारलेल्या संपाला पाठिंबा देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरातील रिक्षाचालक (Rickshaw Driver) आणि टॅक्सी चालकांनी (Taxi Driver) देखील बंदची हाक दिली आहे. त्यामुळे आज सकाळपासून शहरातील रिक्षा आणि ग्रामीण भागातून शहारत येणाऱ्या काळी पिवळी टॅक्सी संपूर्णपणे बंद असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. परिणामी शहरात धावणाऱ्या सिटी बसमध्ये (City Bus) मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. 

केंद्र सरकारने नवीन वाहन कायदा रद्द करावा या मागणीसाठी आज मध्यरात्रीपासून ट्रकचालक आणि इंधन टँकर चालकांनी संपाची हाक दिली आहे. त्यांच्या याच संपला शहरातील रिक्षा चालकांनी देखील पाठिंबा दिला आहे. शहरातील रिक्षा 10 जानेवारीला बंद असणार असल्याची माहिती गेल्या दोन दिवसांपासून रिक्षा चालकांकडून देण्यात येत होती. यासाठी अनेक रिक्षांवर त्याबाबत लेखी सूचना देखील लिहिण्यात आल्या होत्या. त्यानुसार आज सकाळपासून शहरातील रिक्षा बंद असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सकाळी घराबाहेर पडलेल्या संभाजीनगरकरांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. 

रिक्षा चालकांकडून रास्ता रोको…

रिक्षा चालकांनी पुकारलेल्या संपानंतर छत्रपती संभाजीनगर-पैठण महामार्गावर रास्ता रोको देखील करण्यात आला. पैठण रस्त्यावरील गेवराईजवळ काही रिक्षा चालकांनी रास्ता रोको केला. त्यांच्या याच आंदोलनात अवजड वाहन चालकांनी देखील सहभाग नोंदवला. त्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. शहरात कॉलेज आणि महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील याचा फटका बसला. दरम्यान, याची माहिती मिळताच बिडकीन पोलिसांनी आंदोलनास्थळी धाव घेतली. तसेच रिक्षा चालकांची समजूत काढत रस्ता मोकळा केला. त्यानंतर, पुन्हा एकदा वाहतूक सुरळीत सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.

पेट्रोल पंपावर मोठी गर्दी…

नवीन वाहन कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी टॅंकर चालकांनी संप पुकारला आहे. त्यामुळे इंधन टंचाई निर्माण होण्याच्या भीतीने नागरिक पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गर्दी करत आहे. शहर आणि ग्रामीण भागातील अनेक पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहे. अनेक जण आपल्या वाहनांमध्ये अधिकच इंधन भरताना पाहायला मिळत आहे.

शहरातील सिटी बस सेवा सुरु…

एकीकडे रिक्षा चालक यांनी आपल्या प्रलंबित मागण्यासाठी बंदची हाक दिली आहे. दुसरीकडे अशा परिस्थितीत नागरिकांचे हाल होऊ नयेत यासाठी महानगरपालिकेच्या सिटी बस नागरिकांना सुविधा देत आहेत. त्यामुळे सकाळपासूनच सर्व मार्गावर सिटी बस धावत आहे. मात्र, नेहमीपेक्षा अधिक प्रवासी बसमधून प्रवास करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे रिक्षा चालकांचा संप कधीपर्यंत सुरु राहणार याबाबत कोणतेही अधिकृत माहिती रिक्षा चालक संघटनेच्या वतीने मिळालेली नाही. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

मोठी बातमी! मनमाडमधील पेट्रोल-डिझेल टँकर चालक पुन्हा संपावर; राज्यात पुन्हा इंधन टंचाईची शक्यता

[ad_2]

Related posts