Pune News Phd Paper Leak Barti Sarthi Mahajyoti Cet Exam Paper Leak In Pune And Nagpur Student Aggressive In AISSMS College Ground Pune

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे: महाज्योती Phd फेलोशिपचा पेपर पेपर फुटला आहे, त्यामुळे पुण्यातील विविध परिक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी परिक्षेवर बहिष्कार टाकला आहे. यावरुन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेट विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. आम्ही परिक्षाच देत राहू की संशोधन करु, अशा शब्दांत विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. सरसकट फेलोशिप देण्याची मागणी देखील संतप्त विद्यार्थ्यांनी केली आहे. 

पेपर सीलबंद नसल्याचं समोर

पुणे येथील श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय वडगाव येथील परीक्षा केंद्रावर सारथी, बार्टी, महाज्योती संशोधन संस्थांसाठी घेण्यात येत असलेल्या पात्रता (CET) परीक्षेत झेरॉक्स प्रश्नपत्रिका देण्यात आल्या, तर प्रश्न पत्रिकेतील सी आणि डी प्रश्नपत्रिकेला सील नसल्याचं निदर्शनास आल्याने विद्यार्थ्यांनी सार्वत्रिकरित्या बहिष्कार टाकत निषेध नोंदवला. शिवाय परीक्षेवर बहिष्कार टाकण्यात आला. त्यासोबतच  पुण्यातील AISSMS कॉलेजच्या परिक्षा केंद्रात सगळ्या विद्यार्थ्यांनी परिक्षेवर बहिष्कार टाकला आहे. एक दोन नाही तर, शेकडो विद्यार्थी या परिक्षेवर बहिष्कार घालून कॉलेजच्या प्रांगणात एकत्र आले आहेत. या सगळ्या विद्यार्थ्यांकडून पेपर लीक झाल्याचा आरोप केला जात आहे. 

सरसकट फेलोशिप द्या!

सगळे विद्यार्थी  SET, NET च्या परिक्षा पास करुन ही परिक्षा देण्यासाठी आले आहेत, त्यामुळे आता विद्यार्थ्यांना पुन्हा CET देण्याची आवश्यकता नाही. ज्यावेळी या परिक्षेचा फॉर्म भरण्यात आला त्यावेळी या CET च्या परिक्षेचा उल्लेख करण्यात आला नाही. चार महिन्यांनी ही परिक्षा असेल, अशी माहिती मिळाली. मात्र आज या परिक्षेचे पेपर सील फुटलेले देण्यात आले. त्यामुळे आता कोणतीही परिक्षा न घेता आम्हाला सरसकड फेलोशिप देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. 

लहान बाळ घेऊन महिला परिक्षा केंद्रांवर 

हा पेपर देण्यासाठी अनेक मुली आणि महिलादेखील परिक्षा केंद्रांवर आल्या आहेत. अनेक महिला थेट आपलं काही महिन्यांचं बाळ घेऊन पेपर सोडवण्यासाठी आल्या. त्यांनीदेखील संताप व्यक्त केला आहे. आम्ही बाळं सांभाळू, संशोधन करु की 10 वेळा परिक्षाच देत बसू, अशी संतप्त प्रतिक्रिया या महिलांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. शिवाय वर्गात पेपरदेखील कमी पडल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. परिक्षेसंदर्भात कोणतंही नियोजन केलं नाही का ? असा प्रश्न देखील विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. 

इतर महत्वाची बातमी-

33 देशांनी मुख्यमंत्र्याची नाही तर त्यांच्या गद्दारीची दखल घेतली, आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

[ad_2]

Related posts