Rashid Khan Ruled Out Of The T20I Series Vs India Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

India vs Afghanistan 1st T20 : भारत आणि अफगाणिस्तान (IND vd AFG) यांच्यामध्ये गुरुवारपासून टी 20 मालिकेला सुरुवात होणार आहे. पण एक दिवस आधीच अफगाणिस्तान संघाला मोठा धक्का बसला आहे. अफगाणिस्तानचा स्टार खेळाडू राशिद खान भारताविरोधातील टी 20 मालिकेला मुकणार आहे. दुखापतीमुळे राशिद खान याने टी 20 मालिकेतून माघार घेतली.

राशिद खान याला पाठदुखीचा त्रास होतोय. त्यामुळे त्याने भारताविरोधातील तीन सामनच्या टी 20 मालिकेतून माघार घेतली आहे. अफगाणिस्तान क्रिकेट संघाला हा मोठा धक्का मानला जातो. राशिद खान दर्जेदार फिरकी गोलंदाज आहे, त्याच्यापुढे दिग्गज फलंदाजही गुडघे टेकतात, त्याशिवाय अखेरच्या क्षणी तो फटकेबाजी करण्यातही तरबेज आहे. त्यामुळे राशिदची अनुपस्थिती अफगाणिस्तानसाठी मोठा धक्का मानला जातोय. 

11 जानेवारीपासून मालिकेला सुरुवात – 

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्याची मालिका गुरुवार, 11 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना मोहाली येथे होणार आहे. 14 जानेवारी रोजी इंदूर येथे होणार आहे. तर मालिकेतील अखेरचा सामना 17 जानेवारी रोजी बंगळुरुमध्ये होणार आहे. सर्व सामने संध्याकाळी सात वाजता होणार आहेत. 
 

टी-20 अंतरराष्ट्रीय सामन्यात राशिदची कामगिरी – 
6 ऑक्टोबर 2015 रोजी राशिद खान याने टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत 82 सामने खेळले आहेत. 14.80 च्या सरासरीने 130 विकेट घेतल्या आहेत. राशिद खान याने चार वेला चारपेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. तर दोन वेळा पाच विकेट घेतल्या आहेत. त्याशिवाय फलंदाजीत 130 च्या स्ट्राईक रेटने 370 धावा चोपल्यात.

अफगानिस्तानचा संपूर्ण संघ : इब्राहिम जादरान (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलिखिल (विकेटकीपर), हजरतुल्लाह जजई, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, करीम जनत, अजमतुल्लाह उमरजई, शराफुद्दीन अशरफ, मुजीब-उर-रहमान, फजलहक फारूकी, फरीद अहमद, नवीन-उल-हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदीन नायब  
  
अफगानिस्तान टी20 मालिकेसाठी भारताचा संपूर्ण संघ – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जायसवाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, रवि बिश्वोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार आणि आवेश खान.

आणखी वाचा :

IND vs AFG : रोहितसोबत सलामीला कोण? पहिल्या टी 20 साठी अशी असेल टीम इंडिया? 



[ad_2]

Related posts