Makar Sankranti 2024 Know the Origin and History of sesame in Marathi; मकर संक्रांतीला वापरला जाणार तीळ मुळचा कुठचा? जाणून घ्या इतिहास

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मकर संक्रात हा सण भारतात वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जाता. अगदी पोंगल, लोहरी, उत्तरायण, मेघ बिहू आणि बरंच काही. हिंदूचा हा सण भारतातील अनेक भागात जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात साजरा केला जातो. हा सण हे सूर्यदेव, सूर्य आणि सूर्याचे धनु राशीतील ज्योतिषीय स्थानापासून मकर राशीत होणारे संक्रमण यांना समर्पित केला आहे. हा एक कापणीचा सण आहे जो हिवाळ्याच्या शेवटी आणि उबदार दिवसांच्या आगमनाचे प्रतीक आहे. सर्व भारतीय सणांप्रमाणे, अन्न हा उत्सवाचा अविभाज्य भाग आहे, परंतु मकर संक्रांतीसाठी, तीळ विशेषतः महत्वाची भूमिका बजावत असतात.

तीळ मुळचे कुठले?

तीळ हा पदार्थ अनेक शतकांपासून आहारात समाविष्ट आहे. आशिया किंवा पूर्व आफ्रिकेत तीळ वापरले जात असे. तसेच  प्राचीन इजिप्शियन लोकांनी तिळाचे दाणेदार पीठ बनवले. चायनीज इंक ब्लॉक्स बनवणाऱ्या काजळीचा आधार म्हणून 5,000 वर्षांपूर्वी चिनी लोकांनी देखील तिळाच्या बियांचा वापर केला होता.

दोन प्रकारचे तीळ 

तीळ दोन मुख्य प्रकारात बाजारात उपलब्ध अशतात. पांढरा तीळ आणि काळा तीळ.  पांढरे तीळ हे भारतात सर्वात जास्त वापरले जाणारे तिळ आहे. हे बहुतेकदा गुळाबरोबर तयार केल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये सर्रास वापरले जाते. तीळ आणि गुळ या दोन्ही घटकामधून शरीरात उष्णता निर्माण होण्यास मदत होते. प्राचीन आयुर्वेदात त्यांना त्यांच्या उच्च पौष्टिक मूल्यासाठी देखील खूप महत्वाचे मानले जाते. हे रक्तदाब कमी करण्यास, तणाव कमी करण्यास आणि हाडांचे आरोग्य आणि रिप्रोडक्टिविटीचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकते. मकर संक्रांतीची सुरुवात विधीवत स्नान करून, सहसा नदी किंवा समुद्रात, त्यानंतर रक्ताभिसरण उत्तेजित करण्यासाठी तिळाच्या तेलाने मालिश करण्याची प्रथा आहे.

पौराणिक संबंध

तिळाच्या बियांना मृत्यूची देवता भगवान यम यांनी आशीर्वाद दिला असे म्हटले जाते आणि ते ‘अमरत्वाचे बीज’ म्हणून ओळखले जाते. मंदिरांमध्ये तांब्याच्या भांड्यात तीळ आणि गुळाचा नैवेद्य देण्याची प्रथा आहे. नाते अधिक घट्ट करण्यासाठी किंवा नात्यातील दुरावा दूर करण्यासाठी तिळ गूळ दिले जाते. महाराष्ट्रात सामान्यतः वापरली जाणारी एक म्हण आहे ‘तीळ गूळ घ्य आणि गोड गोड बोला’.

साधे तीळ हा मकर संक्रांतीच्या परंपरेचा अविभाज्य भाग बनला असेल पण त्याला कायम ठेवण्याचा मोठा वारसा आहे. त्यामुळे मकर संक्रांतीला तीळाचे पदार्थ खाताना हा इतिहास लक्षात ठेवा आणि आहारात तिळाच्या पदार्थांचा समावेश नक्की करा. 

Related posts