Meta New Protections To Give Teens More Age Appropriate Experiences On Facebook And Instagram

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Age Appropriate Content for Kids – सध्या अनेक मुलं सोशल मीडिया वापरत (Content) असतात. त्यात  (Social Media)लहान मुलं अनेकदा नको तो कंटेन्ट बघतात. त्यामुळे लहान मुलांच्या मनावर परिणामदेखील होऊ शकतो. लहान मुलांच्या मनावर कोणताही परिणाम होऊ नये, म्हणून मेटा कंपनीने मोठं पाऊल उचललं आहे.  

सोशल मीडियामध्ये नावाजलेली कंपनी मेटा हीने एक ब्लॉगपोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये कंपनीने लहान मुलांना प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या सेनसिटीव्ह कंटेंटच्या एक्सपोजरपासून वाचवण्यासाठी नवीन टुल्सची माहिती शेअर केली आहे. यात मेटाने म्हटले आहे की, कंपनी याच्यापुढे मुलांना सेन्सिटिव्ह कंटेंट दाखवणार नाही. सोबतच काही विशेष प्रकारच्या टर्म्स  मुलांसाठी रेस्ट्रिक्ट केलं जाणार. जर कोणचंही मुल या विषयाचा कंटेंट मेटा प्लॅटफॉर्मवर सर्च करत असेल तर कंपनी त्याला तो कंटेंट दाखवण्याच्या ऐवजी वेगळ्या पद्धतीचा कंटेन्ट दाखवला जाईल. 

मेटाने सांगितले आहे की, सगळ्या मुलांना कंपनी मोस्ट रेस्टीक्टीव कंटेंट कंट्रोल सेटिंग मध्ये ठेवेल. नवीन अकाउंट वर कंपनीने ही सेटिंग लागू केली आहे. आणि जुन्या अकाउंटला यामध्ये सामील केले जाणार आहे. याच पद्धतीने मुलांना सुसाईड सेल्फ हार्म, इटिंग डिसऑर्डर अशा वेगवेगळ्या सेंसेटिव्ह कंटेंटपासून लांब ठेवण्यात येईल. त्यांना एक्सप्लोर आणि रिल्स मध्ये अशा पद्धतीचा कोणताही कंटेंट दाखवला जाणार नाही. मेटाने असे सांगितले आहे की, येणाऱ्या आठवड्यापासून ही अपडेट सगळ्या युजर्सना लागू करण्यात येईल आणि युजर्सना त्यांच्या वयानुसार कंटेंट दाखवण्यात येईल. 

मेटा युरोप आणि युएसमध्ये पहिल्यापासूनच सरकारचा दबाव झेलत आहे. सरकारचं असं म्हणणं आहे की, मेटाचे ॲप्स लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कंटेंट दाखवतात. मात्र त्याच्या दुष्परिणाम आणि बाबत कोणतीही माहिती देत नाही.  EU च्या म्हणण्यानुसार मेटाच्या ॲप्समुळे मुलांच्या मेंटल हेल्थवर वाईट परिणाम होतो.गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, कॅलिफोर्निया आणि न्यू यॉर्कसह 33 यूएस राज्यांतील ऍटर्नी जनरलनी कंपनीवर कोर्टात सुनावणी करण्यात आली. त्यात असे म्हटले होते की त्यांनी आपल्या प्लॅटफॉर्मच्या धोक्यांबद्दल लोकांची वारंवार दिशाभूल केली होती. मेटाला कंटेंटच्या संदर्भात वेगवेगळ्या देशांतील सरकारकडून सतत दबावाचा सामना करावा लागतो आहे. 

इतर महत्वाची बातमी-

WhatsApp Security Tips : ‘या’ तीन प्रकारे सुरक्षित करा तुमचं Whatsapp अकाऊंट, नाहीतर पर्सनल डेटा गेलाच म्हणून समजा!

[ad_2]

Related posts