Ayodhya Ram Mandir Ayodhya January 22 Air Fare For Ayodhya Is More Expensive Than Dubai Singapore

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिराचा उद्घाटन सोहळा 22 जानेवारी रोजी पार पडणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान, अयोध्येतील या उद्घाटन सोहळ्यासाठी राम भक्त उत्सुक आहेत. दरम्यान, अयोध्येला जाण्यासाठी विमानप्रवास महागला आहे. दुबई, सिंगापूरपेक्षाही अयोध्येला जाण्यासाठी विमानाचे तिकीट जास्त आहे. अयोध्येसाठी थेट विमानसेवा सुरु झाल्याने हवाई वाहतूक कंपन्यांनी प्रवासाचे दर वाढवले आहेत. 

दुबई, सिंगापूरपेक्षा अयोध्येला जाण्यासाठी विमानाचे तिकीट महाग

सध्या अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यसाठी हजर राहण्यासाठी राम भक्त प्रयत्न करत आहेत. 22 जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी भक्तांचा ओढा वाढताना दिसत आहे. त्यातच अयोध्येला थेट विमानसेवा सुरु झाल्याने हवाई वाहतुकीचे दर वाढवण्यात आले आहेत. दुबई आणि बँकॉकपेक्षा अयोध्येला जाण्यासाठी तिकीट जास्त आहे. 

कसे आहेत विमान प्रवासाचे दर?
 

मुंबई ते दुबई – 16,937

मुंबई ते सिंगापूर -13,800 

मुंबई ते बँकॉक – 16,937 

मुंबई ते अयोध्या – 20,700  
 

अयोध्येत विमानसेवा सेवेला सुरुवात 

‘अयोध्येत मर्यादा पुरोषोत्तम श्री राम आंतरराष्ट्रीय विमानतळा’ची निर्मिती करण्यात आली आहे. ‘इंडिगो’ने (Indigo)  दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यामध्ये अयोध्येतून दिल्ली आणि अहमदाबादसाठी फ्लाईट सुरु होणार आहेत. इंडिगो ही कंपनी अयोध्येतून व्यावसायिक दृष्ट्या 6 जानेवारीपासून मुंबईसाठी विमानसेवा सुरु करण्यात आली. राममंदिराची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.  22 जानेवारीला रामजन्मभूमीत रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी राममंदिराची तयारी अंतिम टप्प्यात आहे. देशभरातून रामभक्त अयोध्यानगरीत दाखल होतील. त्यामुळे इंडिगोने मुंबईतून फ्लाईट सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. 

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी कोणाला निमंत्रण?

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशातील सर्व मान्यवरांना निमंत्रण पत्रही पाठविण्यात आली आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह 6000 हून अधिक लोक या भव्य कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. हा दिवस भारतात एखाद्या मोठ्या सणासारखा साजरा करण्यात येणार आहे. याच दिमाखादार सोहळ्याचं निमंत्रण पत्र आता समोर आलं आहे.  अयोध्येत रामलालच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी  पाठवण्यात येणाऱ्या निमंत्रण पत्रिकेत अनेक गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. या पत्रात म्हटलं आहे की, मंदिराच्या ठिकाणी सकाळी 11 वाजता प्रवेश करावा लागेल. कार्यक्रम किती तास चालेल? कार्यक्रमात कोणत्या गोष्टी आणणे बेकायदेशीर आहे? या सर्व गोष्टी निमंत्रण पत्रात लिहिलेल्या आहेत. तसेच 15 जानेवारी ते 24 जानेवारी या कालावधीत विशेष विधी होणार असल्याचं सांगण्यात आले आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला विविध संप्रदायातील संतही उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

Ram Mandir Inauguration: अयोध्येतील राम मंदिराच्या कार्यक्रमात काँग्रेस सहभागी होणार नाही, भाजप आणि RSS चा इव्हेंट असल्याचा आरोप

[ad_2]

Related posts