Gondia Crime News Firing On Gondia Former Corporator Lokesh Yadav Unknown Accused Absconding Maharashtra

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Gondia News:  गोंदिया (Gondiya)  शहरातील माजी नगरसेवक लोकेश उर्फ कल्लू यादव यांच्यावर भरदिवसा गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात लोकेश यादव हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने नागपूरला हलवण्यात आलं आहे. गोळीबाराच्या (Gondia Crime News) या घटनेनंतर गोंदिया शहरात एकच  खळबळ उडाली असून सर्वत्र भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र या हल्ल्यातील मारेकऱ्यांची ओळख पटली नसून मारेकऱ्यांचा शोध पोलीस घेत आहे. 

दिवसाढवळ्या गोळीबाराचा थरार 

काही दिवसांपूर्वी पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने पुण्यासह राज्यात एकच खळबळ उडाली. ही घटना ताजी असतानाच गुरुवारी (दि. 11) सकाळी तीन अनोळखी व्यक्तींनी गोंदिया शहराच्या यादव चौकाजवळ माजी नगरसेवक लोकेश यादव यांच्यावर  गोळ्या झाडल्या. लोकेश यादव यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरुबातीला त्यांना गोंदियातील कुंवर तिलक सिंग जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र यादव हे गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले. 

लोकेश उर्फ कल्लू यादव हे माजी नगरसेवक असून ते अनेक सामाजिक कार्यात सक्रीय आहे. तर त्यांचे भाऊ पंकज यादव हे ठाकरे गटाचे शहर जिल्हाध्यक्ष आहेत. या गोळीबारामागील नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरी, गोळीबाराच्या घटनेनंतर शहराच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहे.  

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. गोळीबार करणारे मारेकरी नेमके कोण, हे अद्याप कळू शकले नाही. अज्ञात मारेकऱ्यांचा शोध सध्या पोलीस घेत असून पुढील तपासाला वेग आला आहे. आजच्या घटनेमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही काळात नागपूरसह विदर्भात अवैध बंदुकीचा वापर होताना आढळून आला आहे. शिवाय पोलिसांनी अनेकांच्या मुसक्यादेखील आवळल्या आहेत. ज्यामध्ये मोठ्याप्रमाणात अवैध शस्त्रांचे घबाड पोलिसांच्या हाती लागले आहे. मात्र गुरुवारच्या घटनेमुळे गुंडांना पोलिसांचा धाक नाही का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.  

इतर महत्वाच्या बातम्या 

[ad_2]

Related posts