Tech News Instagram Scam Social Media Scam Instagram Can Empty Bank Account Scammers Targeting Users

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Instagram Scam : आपण सगळेच सोशल मीडियावर रोज अॅक्टिव्ह (Instagram)असतोच पण यावरूनच भरपूर प्रमाणात ऑनलाईन फ्रॉड होत असतात त्यातील एक म्हणजे इंस्टाग्रामवरून नोकरीच्या नावाखाली बँक खात्याची माहिती मागवून लोकांची फसवणूक करतात. तुम्ही देखील इंस्टाग्राम वापरत असाल तर हे जाणून घेणं खूप महत्वाचे आहे. अशीच एक चुक तुम्हाला देखील खूप महागात पडून शकते. यापूर्वी या इंस्टाग्रामवरील ऑनलाईन फ्रॉडमुळे अनेकांचे खिसे रिकामे झाले आहेत. 

इंस्टाग्रामवर मेसेज करुन फसवणूक

स्कॅमर इंस्टाग्रामवर मेसेज पाठवून लोकांना टार्गेट करताना दिसत आहेत. लोकांना नोकरी देण्याच्या नावाखाली अडकवून फसवण्याचा प्रयत्न करतात. अशीच घटना ही पुर्व दिल्लीत राहणाऱ्या राहुल नावाच्या तरुणासोबतही घडली आहे. , आम्ही तुम्हाला नोकरी देऊ असा मेसेज  त्याला आला होता. या मेसेजमध्ये एक लिंक पाठवण्यात आली होती.  त्या लिंकवर क्लिक करताच दुसरे पेज ओपन झालं आणि संबंधित प्रत्येक माहिती मागवली. तिथे फक्त आपल्या बँक डिटेल्स भरण्यास सांगितलं होलं. पण जेव्हा बँक डिटेल्स भरले तेव्हा एक OTP आपल्या पाठवण्यात आला आणि त्यानंतर काही वेळात त्याच्या आकाऊंटमधून पैसे डेबिट झाल्याचा मेसेज आहे. खरंतर हे सगळं स्कॅमर्सने केलं असल्याचं राहुलच्या फार उशीरा लक्षात आलं. मात्र एक क्लिक केल्याने त्याचा खिसा खाली झाला होता.

ऑनलाईन फ्रॉड कसा केला जातो?

नोकरी देण्याच्या नावाखाली युजर्सकडून बँकेची सगळी माहिती काढून घ्यायची. नोकरी मिळाल्याव पगार पाठवण्यासाठी हे सगळे बॅंक डिटेल्स मागवले जातात. एकदा बँंक डिटेल्स त्यांच्याकडे गेले की ते आपलं अकाउंटमधून पैसे काढण्याचा प्रयत्न करत असतात. ज्यावेळी हा सगळा प्रॉड असल्याचं तुम्हाला कळतं मात्र तोपर्यंत तुमचं अकाउंट नील झालेलं असतं.

कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका

तुम्ही अनेकदा सोशल मीडिया वापरत वेगवेगले मेसेज येतात. त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या लिंक्स दिलेल्या असतात आणि आपल्याला अनेक गोष्टींचे आमिष दाखवून त्या लिंकवर क्लिक करायला भाग पाडतात मात्र कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका, असं सायबर एक्सपर्ट कायम सांगत असतात. तरीही आपण सायबर भामट्यांनी दाखवलेल्या आमिषाला बळी पडतो आणि आपला खिसा खाली करुन घेत असतो. 

इतर महत्वाची बातमी-

CES 2024 : लॉंच झाला आहे Android आणि Windows दोन्हींवर चालणारा लॅपटॉप, जाणून घ्या नेमकं कसं करतो काम?

 

[ad_2]

Related posts