Why R Ashwin Is Not in Team India Playing XI of IND vs AUS WTC Final 2023 Rohit Sharma Explained; आर अश्विनला WTC फायनलच्या संघातून का वगळले? रोहितने सांगितले कसा घेतला अवघड निर्णय

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लंडन: बहुप्रतीक्षित वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आज म्हणजेच ७ जूनपासून लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवली जात आहे. भारत आणि अंतिम सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण नाणेफेकीनंतर रोहितने संघातील गोलंदाजांबद्दल सांगताना सर्वांना एकच धक्का दिला. कारण जगातील नंबर १ कसोटी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला या सामन्यात न खेळवण्याचा निर्णय संघाकडून घेण्यात आला आहे आणि त्याच्या जागी एक अतिरिक्त सीमर अंतिम सामन्यात खेळत आहे. पण अश्विनला या सामन्यात संघाबाहेर का ठेवले, याचे कारण स्वतः रोहित शर्माने नाणेफेक झाल्यानंतर सांगितले.काय म्हणाला कर्णधार

नाणेफेकीनंतर बोलत असताना अश्विनला संघाबाहेर ठेवणे कठीण असल्याचे त्याने सांगितले. तो म्हणाला; आम्ही प्रथम गोलंदाजी करू, परिस्थिती आणि हवामान देखील ढगाळ आहे. मला वाटत नाही की खेळपट्टी फार बदलेल. आम्हाला चांगले क्रिकेट खेळावे लागेल आणि अव्वल स्थानावर यावे लागेल. संघात चार वेगवान गोलंदाज आणि एक फिरकीपटू (जडेजा) आहे. अश्विनला संघातून वगळ्याबद्दल बोलताना रोहित म्हणाला, “हे नेहमीच कठीण असते. इतक्या वर्षात तो आमच्यासाठी सामना विजेता खेळाडू ठरला आहे. पण तुम्हाला संघासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी कराव्या लागतात आणि शेवटी आम्ही तो निर्णय घेतला.”

३६ वर्षीय अश्विनला प्लेइंग इलेव्हनमधून वगळणे अनेकांसाठी आश्चर्यचकित करणारे होते कारण २०२३च्या बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीमध्ये भन्नाट फॉर्ममध्ये होता, जो भारताने या वर्षाच्या सुरुवातीला २-१ च्या फरकाने जिंकली होती. भारतात खेळल्या गेलेल्या चार सामन्यांच्या मालिकेत, अश्विनने सर्वाधिक २५ विकेट घेतले आणि मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळवला.

आयपीएल ट्रॉफी घेऊन तिरुपतीच्या दर्शनाला, सीएसकेकडून खास पूजा

WTC साठी भारताची प्लेइंग इलेव्हनरोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, एस भरत, रविंद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

[ad_2]

Related posts