माजी महापौर राहुल जाधव यांच्याहस्ते कामाला सुरूवात

पिंपरी (pragatbharatnews):उघड्या वीजवाहिन्यांमुळे नागरी सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर भोसरी विधानसभा मतदार संघांतर्गत उच्चदाब वीजवाहिन्या भूमिगत करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. मोशी आणि संभाजीनगर येथील वीजवाहिनी भूमिगत करण्याचे काम सुरू केले असून, त्यामुळे ४० हजार नागरिकांना दिलासा मिळाला आहे.भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्याकडे देहू रस्ता, मोशी, संभाजीनगर कॉलनी १, २ आणि ३ परिसरातील घरांवरुन जाणारी उच्चदाब वीजवाहिनी भूमिगत करण्याबाबत स्थानिक नागरिकांनी मागणी केली होती. त्या अनुशंगाने पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे १ हजार मीटर वीजवाहिनी भूमिगत करण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली.यावेळी माजी महापौर राहुल जाधव, माजी नगरसेविका सारिका बोऱ्हाडे, अश्विनी जाधव, निलेश बोराटे, निखिल बोऱ्हाडे, नितीन बोऱ्हाडे, मंगेश हिंगणे, सागर हिंगणे, सोनम जांभूळकर, नाना सासवडे, राजेश सस्ते, गणेश सस्ते, वंदना आल्हाट, राहुल सस्ते यांच्यासह स्थानिक नागरीक यावेळी उपस्थित होते.

प्रतिक्रिया :समाविष्ट गावांतील वीजवाहिन्या अद्यापही उघड्यावर आहेत. पावसाळ्यात या वीजवाहिन्या तुटून किंवा वीज प्रवाहित होवून दुर्घटना होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी आमदार महेश लांडगे यांच्याकडे वीजवाहिनी भूमिगत करण्याची मागणी केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आमदार लांडगे यांनी पावसाळ्यापूर्वी सदर काम पूर्ण करण्याची सूचना प्रशासनाला केली आहे. वीज समस्या सोडवण्याबाबत आमदार लांडगे सातत्त्याने पाठपुरावा करीत आहेत.

Related posts