Call Forwarding Scam 401 Government Warns Jio Airtel Vodafone Idea Bsnl Users Know How To Prevent

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Call Forwarding Scam : देशात सध्या सायबर भामट्यांनी चांगलाच धुमाकूळ (cyber crime) घातला आहे. या सायबर भामट्यांपासून वाचण्यासाठी सरकारने देशातील करोडो मोबाईल फोन युजर्सना इशारा दिला आहे. दूरसंचार विभागाने युजर्सना काही कॉलपासून सावध राहण्यास सांगितले आहे .  ‘स्टार 401 हॅशटॅग’ (*401#) डायल करून सायबर भामटे युजरच्या मोबाईल नंबरवर कॉल करून OTP म्हणजेच वन टाइम पासवर्ड मागतात. हे कळलं की सायबर भामट्यांना युजर्सच्या सगळे कॉल फॉरवर्ड करण्याची परवानगी मिळते आणि नंतर सर्व डिटेल्स मिळवून बँक खाते रिकामे करतात . त्यामुळे सर्वांनाच सतर्क राहण्याचा सल्ला सायबर एक्सपर्ट देत आहेत. 

चुकूनही *401# डायल करू नका.

दूरसंचार विभागाने Airtel, Jio, Vodafone-Idea, BSNL च्या सर्व युजर्सना अशा इनकमिंग कॉल्सपासून सावध राहण्यास सांगितले आहे. या आधीही ऑक्टोबरमध्ये *401# कॉल फॉरवर्डिंग स्कॅमची प्रकरणे समोर आली आहेत. गुन्हेगार ऑनलाइन डिलिव्हरी, बँक किंवा इतर सेवांचे एजंट म्हणून सांगतात आणि युजर्सना या नंबरवर कॉल करण्यास सांगतात. युजर्स स्कॅमर्सच्या सापळ्यात अडकतात आणि हा विशेष USSD कोड टाकून, ते सायबर गुन्हेगारांनी दिलेल्या अनोळखी नंबरवर त्यांच्या फोनवरील सर्व इनकमिंग कॉल्सना परवानगी देतात.

नेटवर्क अपग्रेडच्या नावाखाली फसवणूक

बँकिंग एजंट किंवा टेलिकॉम ऑपरेटर सपोर्ट असल्याची बतावणी करणारे सायबर गुन्हेगार युजर्सला कॉल करतात आणि नेटवर्क समस्या किंवा इतर कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी हा नंबर डायल करण्यास सांगतात. दूरसंचार विभागाने युजर्सना अशा कोणत्याही सर्व्हिस कॉलकडे दुर्लक्ष करण्यास आणि कॉल फॉरवर्डिंग केलेले नंबर वापरू नये, असे सांगितले आहे.

असे कॉल फॉरवर्ड करणे थांबवा!

1) जर युजर्स सायबर गुन्हेगारांना बळी पडले आणि कॉल फॉरवर्डिंग चालू झालेच तर त्यांना स्मार्टफोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन ते फॉरवर्डिंग कॉल त्वरित बंद करावे.

2) यासाठी यूजर्सला फोनच्या सेटिंगमध्ये जावे लागेल.

3) यानंतर, तुम्ही कॉल सेटिंग्जमध्ये जाऊन कॉल फॉरवर्डिंग पर्याय वर जाऊन डिसेबल करू शकतात किंवा डीफॉल्ट सेटिंग्ज करू शकता.

सोशल मीडियावरील कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका

तुम्ही अनेकदा सोशल मीडिया वापरत वेगवेगले मेसेज येतात. त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या लिंक्स दिलेल्या असतात आणि आपल्याला अनेक गोष्टींचे आमिष दाखवून त्या लिंकवर क्लिक करायला भाग पाडतात मात्र कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका, असं सायबर एक्सपर्ट कायम सांगत असतात. तरीही आपण सायबर भामट्यांनी दाखवलेल्या आमिषाला बळी पडतो आणि आपला खिसा खाली करुन घेत असतो. 

इतर महत्वाची बातमी-

Free Netflix : फ्रीमध्ये Netflix बघण्याचा भारी जुगाड! वाचतील तुमचे सबस्क्रीप्शनचे पैसे, जाणून घ्या ही कमाल ट्रिक्स!

[ad_2]

Related posts