Coronavirus New Cases 1013 Cases Of Jn 1 Have Been Detected Across 16 States In India Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Coronavirus Updates : देशात कोरोनाचा संसर्ग (Covid-19) वाढला असून यामुळे प्रशासनाचीही चिंता वाढली आहे. कोरोनाच्या नवीन JN.1 सब-व्हेरियंटमुळे (JN.1 Sub-Variant) जगासह देशात दिवसागणिक नव्या कोरोना रुग्णांची भर पडत आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे प्रशासनही अलर्टवर आहे. गेल्या एका महिन्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे यामध्ये नवीन JN.1 सब-व्हेरियंटचे रुग्ण जास्त आहेत. चिंताजन बाब म्हणजे देशात नवीन JN.1 कोरोना व्हेरियंट संक्रमितांचा आकडा 1200 पार पोहोचला आहे.

देशात  JN.1 सब-व्हेरियंटचे 1200 हून अधिक रुग्ण

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 609 नवीन कोरोनाबाधित आढळले असून तीन कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. देशात नवीन कोरोना व्हेरियंट  JN.1  वेगाने पसरत आहे.  JN.1 सब-व्हेरियंट सर्वाधिक संसर्गजन्य ओमायक्रॉन व्हेरियंटचा सब-व्हेरियंट असल्याने याचा प्रसार अतिशय वेगाने होत आहे. देशात  JN.1 सब-व्हेरियंटचे 1200 हून अधिक रुग्ण आढळल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

कोणत्या राज्यात किती रुग्ण?

भारतीय SARS-CoV-2 जीनोमिक्स कन्सोर्टियम (INSACOG) ने जारी केलेल्या नवीन आकडेवारीनुसार, कोरोनाच्या JN.1 सब-व्हेरियंटचे सर्वाधिक रुग्ण कर्नाटकमध्ये आढळले आहेत. कर्नाटकमध्ये JN.1 सब-व्हेरियंटचे 215 हून अधिक कोरोना रुग्ण सापडले आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आंध्र प्रदेश असून तिथे 189 रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातही नवीन JN.1 सब-व्हेरियंटचा प्रसार वेगाने होत असून 170 रुग्ण आढळले आहेत. त्याशिवाय केरळमध्ये 154 रुग्ण, पश्चिम बंगालमध्ये 96 रुग्ण, गोव्यात 90 रुग्ण, तामिळनाडुमध्ये 88 रुग्ण आणि गुजरातमध्ये 76 रुग्ण तेलंगणा आणि राजस्थानमध्ये 32 रुग्ण, छत्तीसगडमध्ये 25 रुग्ण, दिल्लीमध्ये 16 रुग्ण, उत्तर प्रदेशात 7 रुग्ण, हरियाणामध्ये पाच रुग्ण, ओदिशामध्ये तीन रुग्ण याशिवाय उत्तराखंड आणि नागालँडमध्ये एक-एक रुग्णांची नोंद झाली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

[ad_2]

Related posts