[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Parliament Security Breach : संसद घुसखोरी प्रकरणातील (Parliament Security Breach) आरोपींची नार्को (narco test) आणि पॉलीग्राफी टेस्ट करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी (police) त्यांचे ब्रेन मॅपिंगही केले. या टेस्ट झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना दिल्लीत आणले. मात्र, आता पोलिसांनी घुसखोरी (Parliament Security Breach) प्रकरणातील मास्टरमाईंड कोण याबाबत मोठा खुलासा केला आहे. संसद घुसखोरी प्रकरणाचा मास्टरमाईंड (mastermind)ललीत झा नसून मनोरंजन डी असल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केलय.
5 आरोपींची नार्को आणि पॉलीग्राफी टेस्ट (Parliament Security Breach)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सागर शर्मा, मनोरंजन डी, अमोल शिंदे, नीलम आजाद, ललित झा आणि महेश कुमावत या 6 आरोपींना शनिवारी पटीयाला उच्च न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. नीलम वगळता इतर 5 आरोपींना पॉलीग्राफी टेस्टसाठी गुजरातमध्ये नेण्यात आले होते. सागर आणि मनोरंजनचीही नॅरो आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट करण्यात आली होती. नीलमने या टेस्टसाठी सहमती दर्शवली नाही. त्यामुळे तिला या टेस्टसाठी नेण्यात आलेले नव्हते. इतर आरोपींच्या मात्र, टेस्ट करण्यात आल्या आहेत.
ललीत नाही तर मनोरंजन आहे मास्टरमाईंड (Parliament Security Breach)
आत्तापर्यंतच्या तपासातून हे स्पष्ट झाले की, आरोपींना सरकारपर्यंत एक मेसेज पोहोचवायचा होता. त्यासाठी संसदेत घुसखोरी करण्याची त्यांची योजना होती. मणिपूरचा प्रश्न, शेतकरी आंदोलन आणि बेरोजगारी या प्रश्नांवर आरोपींना आवाज उठवायचा होता. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, नार्को आणि ब्रेन मॅपिंग टेस्टमधून मनोरंजन हा या घुसखोरीचा मास्टरमाईंड होता, हे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी पोलिसांनी ललीत झा ने घुसखोरी करण्यासाठी योजना आखली होती, असे पोलिसांनी म्हटले होते.
संसद घुसखोरी प्रकरण नेमकं काय? (Parliament Security Breach)
संसदेचे अधिवेशन सुरु असताना काही आरोपींनी बरोजगारी आणि शेतकरी समस्यांवर आवाज उठवण्यासाठी संसदेत घुसखोरी केली होती. लोकसभेत आणि संसदेच्या बाहेर तरुणांनी धुराच्या नळकांड्या फोडल्या यानंतर या प्रकरणी 6 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं होते. त्यातील मुख्य आरोपीचे नाव समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपींच्या नार्को टेस्टही करण्यात आल्या आहेत. संसदेच्या आवारात नळकांड्या फोडल्याचा व्हिडीओ ललित झा याने बनवला होता. त्यानंतर तो व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर अपलोड केला होता.
इतर महत्वाच्या बातम्या
Milind Deora Resigns: तथास्तु! मिलिंद देवरांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा; जयराम रमेश यांची अनुल्लेखानं टीका
[ad_2]