Former Minister Milind Deora Joined The Shinde Group In The Presence Of Chief Minister Eknath Shinde Along With 10 Former Corporators

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : आगामी लोकसभेसाठी दक्षिण मुंबईवर ठाकरे गटाकडून दावा करण्यात आल्यानंतर ‘माजी’च राहण्याच्या शक्यतेनं नाराज झालेल्या माजी खासदार मिलिंद देवरा यांनी अखेर राजकीय देवारा बदलला आहे. काँग्रेसकडून माजी मंत्री राहिलेल्या देवरा यांनी 10 माजी नगरसेवकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. 

मिलींद देवरांसह आज वर्षावर शिंदे गटात कोणाकोणाचा प्रवेश झाला?

  • सुशिबेन शहा, राज्य महिला आयोग, माजी अध्यक्ष 
  • प्रमोद मांद्रेकर , माजी नगरसेवक
  • सुनिल नरसाळे, माजी नगरसेवक
  • रामवचन मुराई , माजी नगरसेवक
  • हंसा मारु, माजी नगरसेवक 
  • अनिता यादव, माजी नगरसेविका
  • रमेश यादव
  • गजेंद्र लष्करी, माजी नगरसेवक
  • प्रकाश राऊत- जनरल सेक्रेटरी मुंबई काॅग्रेस 
  • सुशिल व्यास , मारवाडी संमेलन अध्यक्ष 
  • पुनम कनोजिया 
  • संजय शहा, डायमंड मर्चंट, जैन सेवा संघ- अध्यक्ष 
  • दिलीप साकेरिया – मुंबई काॅग्रेस राजस्थानी सेल- अध्यक्ष 
  • हेमंत बावधनकर- निवृत्त पोलिस अधिकारी 
  • राजाराम देशमुख, सचिव- मुंबई काॅग्रेस – विश्वस्त सिद्धीविनायक मंदीर
  • त्रिंबक तिवारी- सेक्रेटरी, मुंबई काॅग्रेस कमिटी 
  • कांती मेहता- ऑल इंडीया जैन फेडरेशन अध्यक्ष
  • ८५ वर्षीय काॅग्रेसचे कार्यकर्ते जवाहरभाई मोतीचंद यांचा शिंदे गटात प्रवेश

मुस्लिम समाजाचे मौलाना यांचाही शिंदेगटात 

  • मौलाना जियाउद्दीन शेख
  • मौलाना नौशाद खान
  • मौलाना झुबेर खान 
  • मौलाना झिशान खान 
  • मौलाना नासिर खान 
  • मौलाना इरफान खान 
  • मौलाना रहमान कासिम

कोण आहेत मिलिंद देवरा?

काँग्रेस नेते मिलिंद देवरा हे मुंबई काँग्रेसमधील नेते आहेत. दक्षिण मुंबईतील काँग्रेसचा सुसंस्कृत आणि सुशिक्षित चेहरा अशी त्यांची ओळख आहे. ठाकरेंकडून दक्षिण मुंबई मतदारसंघावर वारंवार दावा सांगण्यात आल्यानंतर मिलिंद देवरांच्या नाराजीची चर्चा सुरु झाली. याच नाराजीतून मिलिंद देवरांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मिलिंद देवरा 15 व्या लोकसभेतील सर्वात तरुण सदस्य होते. वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी मिलिंद देवरा खासदार झाले. 2004 च्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या जयवंतीबेन मेहता विरुद्ध 10 हजार मतांच्या फरकानं विजय मिळवला. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत देवरा पुन्हा मुंबई दक्षिण मतदारसंघातून निवडून आले. मिलिंद देवरा यांचा जन्म 4 डिसेंबर 1976 रोजी मुंबईत झाला. 

मिलिंद देवरा यांना सोबत घेतल्यानं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला फायदा होण्याची चर्चा आहे. सध्या शिंदेंकडे दिल्लीत विशेष चेहरा नाही. मिलिंद देवरांच्या निमित्ताने दिल्लीच्या वर्तुळात आणखी जम बसवण्यासाठी एकनाथ शिंदे यांना फायदा होणार आहे. याचसाठी मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे देवरा यांना सोबत घेण्यासाठी आग्रही होते, अशी माहिती आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

[ad_2]

Related posts