Yuvraj Singh Sensational Statement On R Ashwin says Doesnt Deserve A Place In ODI T20I Teams News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Yuvraj Singh On R Ashwin : एकदिवसीय वर्ल्ड कपसाठी आर अश्विनची (Ravi Ashwin) भारतीय संघात निवड करण्यात आली होती, परंतु त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये जास्त संधी देण्यात आली नाही, रोहित शर्माने जडेजा आणि कुलदीपला पसंती दिली होती. त्यामुळे अनेकांनी रोहित शर्मावर टीका केली होती. त्यावर आता वर्ल्ड कप स्टार युवराज सिंहने (Yuvraj Singh) रोहित शर्माचा बचाव करत आश्विनवर मोठं वक्तव्य केलंय.

काय म्हणाला Yuvraj Singh ?

अश्विन एक महान गोलंदाज आहे, पण मला वाटत नाही की, तो एकदिवसीय आणि टी-20 मध्ये स्थान मिळवण्यास पात्र आहे. आश्विन चेंडूने खूप चांगला आहे, पण तो बॅटने काय करू शकतो? किंवा क्षेत्ररक्षक म्हणून काय काय करू शकतो? हे आपण पाहिलंय. त्यामुळे तो कसोटी संघात असायल हवा. कसोटी क्रिकेटमध्ये तो नक्की असायला हवा, पण व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये खेळण्यास तो पात्र असेल, असं मला वाटत नाही, असं युवराज सिंह म्हणतो.

रोहित महान कर्णधार

मी म्हणू शकतो की, रोहित एक महान कर्णधार आहे, त्याच्याकडे पाच आयपीएल ट्रॉफी आहेत, त्याने आपल्याला विश्वचषकच्या अंतिम फेरीत नेलं. तो आयपीएल आणि भारतातील आमच्या महान कर्णधारांपैकी एक आहे. तुम्हाला वर्क लोडचा भार सांभाळायचा असतो, असं म्हणत त्याने रोहित शर्माचं कौतूक केलंय.

हार्दिक पांड्याला वेळ द्या

हार्दिक हा संघाचा अत्यंत महत्त्वाचा सदस्य आहे आणि भारताला त्याची गरज आहे. तो दुखापतीने त्रस्त आहे आणि आम्हाला त्याला बरं होण्यासाठी आणि स्थिर होण्यासाठी वेळ देण्याची गरज आहे. आम्हाला त्याच्याकडून सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. हार्दिक पांड्या दुखापतीने ग्रस्त असल्याने भारताने सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल सारख्या खेळाडूंना भावी कर्णधार म्हणून निवडलं पाहिजे. सूर्यकुमार यादव आहे जो T20I मध्ये भारताचे कर्णधार आहे. शुभमन गिल जो IPL मध्ये कर्णधार असेल, यांच्याकडून चांगल्या कामगिरी पहायला मिळेल, असा विश्वास देखील युवराजने व्यक्त केलाय.

Related posts