Pune Crime Gangster Sharad Mohol Murder In Broad Daylight Due To Charges In The Same Crime From Which He Was Acquitted Pune Police

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पुण्यातील कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ हत्याकांड (Sharad Mohol) प्रकरणात अटकसत्र आणि आरोपांची मालिका सुरुच आहे. पुणे पोलिसांनी शरद मोहोळच्या हत्याकांडानंतर आतापर्यंत तब्बल 24 आरोपींना अटक केली आहे. पहिल्यांदा या प्रकरणात रविवारपर्यंत 13 आरोपींना अटक करण्यात आली होती. यानंतर नवी मुंबईतून रविवारी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करताना  नव्याने 11 जणांना ताब्यात घेतल्याने या प्रकरणातील आरोपींची संख्या आता 24 वर जाऊन पोहोचली आहे. 

गुंड विठ्ठल शेलारसह 11 जणांना घेतलं ताब्यात 

शरद मोहोळच्या खून प्रकरणात सहभागी असल्याच्या कारणावरून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी मध्यरात्री गुंड विठ्ठल शेलारसह 11जणांना ताब्यात घेतलं आहे. पनवेल ते वाशी या दरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. त्यामुळे शरद मोहोळ हत्या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे. हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी लवकरच पोलिसांच्या अटकेत येणार असल्याचा दावा पोलिसांनी केली आहे. मागील दोन दिवसांपासून गुन्हे शाखेचे पोलीस या आरोपींच्या मागावर होते. मात्र ते पोलिसांना हुलकावणी देत होते. अखेर रविवारी मध्यरात्री पनवेल ते वाशी या दरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यासाठी पुणे पोलिसांनी पनवेल पोलिसांची मदत घेतली.

कातिल सिद्दकीच्या हत्येचं कनेक्शन?

दरम्यान, या प्रकरणात आता हिंदुत्ववादी संघटना सुद्धा आक्रमक झाल्या आहेत. गँगस्टर शरद मोहोळच्या हत्येच्या कटातील सूत्रधार शोधण्याची मागणी केली आहे. जर्मन बेस्ट बेकरी स्फोटातील संशयित दहशतवादी कातील सिद्दकीच्या हत्येचं शरद मोहोळ हत्याकांडाशी कनेक्शन असल्याचा दावाही करण्यात येत आहे. मिलींद एकबोटे यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांनी सूत्रधार शोधण्याची मागणी केली आहे. 28 जानेवारी रोजी पुण्यात मोर्चा सुद्धा काढला जाणार आहे. किनारा हॉटेल ते श्री शिवाजी महाराज स्मारक कोथरूडपर्यंत हा मोर्चा काढणार येणार आहे. 

किमान 15 गुन्ह्यांमध्ये अट्टल गुन्हेगार

शरद मोहोळ हा सुमारे 15 गंभीर गुन्ह्यांमध्ये अट्टल दहशतवादी गुंड म्हणून ओळखला जातो. मोहोळ आणि त्याचा म्होरक्या आलोक भालेराव यांच्यावर जून 2012 मध्ये इंडियन मुजाहिद्दीनचा संशयित सदस्य आणि दहशतवादी खटल्यातील संशयित कातील सिद्दीकीचा येरवडा तुरुंगात गळा दाबून खून केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. मोहोळ आणि भालेराव या दोघांचीही जून 2019 मध्ये पुण्यातील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. जानेवारी 2010 मध्ये गुंड किशोर मारणेच्या हत्येप्रकरणी शरद मोहोळचेही नाव होते. दत्तवाडी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या या खून प्रकरणात न्यायालयाने त्याला व त्याच्या सहा साथीदारांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र या शिक्षेविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर 2021 मध्ये उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.

इतर महत्वाच्या बातम्या 

[ad_2]

Related posts