Shivam Dube All Rounder In Two Consecutive Matches Has Strengthened His Claim For The T20 World Cup

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shivam Dube : मिळालेल्या संधीचं सोनं करताना मधल्या फळीत शिवम दुबेनं अफगाणिस्तानविरुद्ध सलग दोन सामन्यात अष्टपैलू कामगिरी केली. दुसऱ्या सामन्यातील शिवम दुबेच्या फटकेबाजीने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. शिवमने मोहालीमध्ये पहिल्या T-20 मध्ये गोलंदाजीत दोन षटकात फक्त 9 धावा देत एक विकेट घेतली. त्यानंतर चौथ्या चेंडूवर 40 चेंडूत 60 धावा करून टीम इंडियाला सहज विजय मिळवून दिला. 

शिवम दुबे थेट हार्दिक पांड्याला पर्याय

रविवारी (14 जानेवारी) इंदूर T20 मध्येही शिवमने एक विकेट घेतानाच 32 चेंडूत 63 धावा कुटल्या. सलग दोन सामन्यात केलेल्या अष्टपैलू खेळीने शिवम दुबेनं टी20 वर्ल्डकपसाठी दावेदारी प्रबळ करून टाकली आहे. विशेष म्हणजे जूनमध्ये होत असलेल्या वर्ल्डकपपूर्वी ही शेवटची आंतरराष्ट्रीय मालिका आहे. शिवम दुबे थेट हार्दिक पांड्याला पर्याय दिसू लागला आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीत चमक दाखताना त्याने ज्याप्रकारे अष्टपैलू कामगिरी केली आहे, त्यामुळे तो टी-20 विश्वचषकासाठी दावेदारी केली आहे. 

शिवम दुबेकडून आयपीएलदरम्यान अशी कामगिरी झाल्यास निश्चित वर्ल्डकपसाठी त्याची दावेदारी आणखी निश्चित होऊ शकते. त्याच्या दावेदारीने इशान किशन, तिलक वर्मा आणि श्रेयस अय्यर यांना तगडी स्पर्धा निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत 15 सदस्यीय संघात स्थान मिळवणे प्रत्येक खेळाडूसमोर मोठे आव्हान असेल. काही खेळाडूंचे T20  विश्वचषकातील स्थान सध्या जवळपास निश्चित मानले जात आहे.

ईशान, श्रेयस आणि तिलक वर्माची अडचण 

शिवम दुबेला टी-20 विश्वचषकात घेतल्यास  चार ते सहा क्रमांकावर मधल्या फळीत पर्याय म्हणून त्याची निवड केली जाऊ शकते. कारण रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल/ऋतुराज गायकवाड/शुबमन गिलने ओपनिंग स्लॉट बुक केला आहे. यानंतर विराट कोहली तिसऱ्या आणि सूर्यकुमार यादव चौथ्या स्थानावर आहे. यानंतर हार्दिक पांड्या पाचव्या क्रमांकावर आहे. सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी केएल राहुल, जितेश शर्मा, रिंकू सिंह, रवींद्र जडेजा आणि अक्सर पटेल अशी नावे आहेत. अशा परिस्थितीत शिवम दुबेला पर्याय म्हणून येथे निवडल्यास श्रेयस अय्यर, इशान किशन आणि तिलक वर्मा नक्कीच बाहेर होतील.

आयपीएलमुळे पुन्हा संधी मिळाली 

शिवम दुबेने देशांतर्गत क्रिकेटमधील दमदार कामगिरीच्या जोरावर नोव्हेंबर 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, पण बॅक टू बॅक खराब कामगिरीमुळे हा खेळाडू टीम इंडियामध्ये नियमित स्थान मिळवू शकला नाही. मात्र, आयपीएलच्या मागील दोन हंगामातील दमदार कामगिरीमुळे त्याला पुन्हा टीम इंडियामध्ये स्थान मिळालं आहे.

IPL 2022 मध्ये शिवमने 28.90 च्या बॅटिंग सरासरीने आणि 156 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. त्यानंतर आयपीएल 2023 मध्ये त्याने 16 सामन्यात एकूण 418 धावा केल्या. या काळात त्याची फलंदाजीची सरासरी 38 आणि स्ट्राईक रेट 158 होता. या काळात त्याने कमी चौकार आणि जास्त षटकार मारले. IPL 2023 मध्ये 12 चौकार आणि 35 षटकार मारले. आयपीएलमधील या स्फोटक कामगिरीचा फायदा शिवमला मिळाला आणि तो गेल्या वर्षभरापासून टीम इंडियाच्या टी-20 संघाचा भाग आहे.

इतर महत्वाच्या बातम्या



[ad_2]

Related posts