BJP Mla Gopichand Padalkar On Ajit Pawar In Baramati Pune Marathi News | बारामतीमध्ये भाजपचं चांगलं काम, त्यामुळेच अजित पवार इकडे आले

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : बारामतीमध्ये भाजप चांगलं काम करत होते, त्यामुळेच अजित पवारांना इकडे यावं लागले असे वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेय. तसेच बारामतीमध्ये आमच्या विचाराचा खासदार होणार हे एक लाख टक्के खरे आहे. तो भाग्यवान कोण असेल मला माहित नाही, असेही पडळकर म्हणाले. ते बारामतीमध्ये बोलत होते. 

भाजप आमदार गोपीचंद पडळकर आज बारामती दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. त्याशिवाय बारामतीमध्ये भाजप चांगलं काम करत होते, म्हणून अजित पवार इकडे आले, असे वक्तव्य केले. पडळकर म्हणाले की, अजित पवार सत्तेत आल्यापासून मी बारामतीला आलो नव्हतो. पण अजून लोकांच्या संपर्कात आहे. बारामतीत दुष्काळ आहे, सरकारने यात लक्ष घातले पाहिजे. मराठवाड्याला पाणी देण्याची कल्पना आली, बारामतीच्या पाण्याच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांना पत्र देणार आहेत. 

राज्याचे मुख्यमंत्री प्रकल्प आणण्यासाठी परदेशात गेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथं राज्यकारभार सांभाळायला सक्षम आहेत. विरोधकांचा जनधर संपला आहे, त्याच्यामुळे विरोधक असे टीका करतात. विधानसभावर जाणे प्रत्येकचे स्वप्न असते, पक्ष माझा विचार करेल. बारामतीत भाजप चांगले काम करीत होते, त्यामुळे अजित पवारांना इकडे यावं लागले. भाजपचे खासदार दिल्लीत पाठवायची जबाबदारी आमची आहे. इथे आमच्या विचाराचा खासदार होणार हे 1 लाख टक्के खरे आहे. तो भाग्यवान कोण असलं मला माहित नाही, असे गोपीचंद पडळकर म्हणाले. 

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, पण…

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. पण ओबीसीमधून द्यायला आमचा विरोध आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नाही. धनगर समाजाच्या आरक्षण संदर्भात आमची लढाई अंतिम टप्प्यात आहे. न्यायालयात आमच्या बाजूनं निकाल लागेल असे आम्हाला वाटतेय. मराठा समाजाचा प्रश्न वेगळा आहे तो समजून घेतला पाहिजे, असे पडळकर म्हणाले. महाविकास आघाडी सरकारने बाजू नीट मांडली नाही. गायकवाड आयोग टिकला असता तर मराठा समाजाला आरक्षण मिळाले असते. जरांगे यांनी मराठा समाजाची फसवणूक करू नये यातून काही मिळणार नाही. मराठा समाजाला आरक्षण द्यावे ते वेगळं द्यावे, असेही ते म्हणाले. 

ठाकरेंनी पळ काढला – 

 उद्धव ठाकरे यांच्यासोबतची 50 लोकं निघून गेले, तुम्ही बहुमत चाचणीला थांबले नाहीत, तुम्ही आधीच पळून गेलात. विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय मान्य नसेल तर कोर्टात जा. लोकांच्यात बाजार मांडून साध्य काय करणार आहात, असा सवाल पडळकरांनी उपस्थित केला.

शिंदेंनी केले त्यापेक्षा जास्त अभ्यास अजित पवारांनी केला असेल –

देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी भाजपवाल्यांना शिवसेनेला मतदान केलं होतं आणि तुम्ही लोकांची दिशाभूल केली. राष्ट्रवादीचा देखील निकाल लागणार आहे, काय लागेल पाहू? अजित पवारांनी नंतर प्रयोग केला आहे. फार अभ्यास करून केला असेल.  जे शिंदेंनी केले त्यापेक्षा जास्त अभ्यास अजित पवारांनी केला असेल.  शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे काय राहिले नाही, त्यामुळे असे सात-आठ महिने असंच होत राहणार लोकांची दिशाभूल होत राहणार, असेही पडळकर म्हणाले. 

[ad_2]

Related posts