Loksabha Election 2024 BJP Maharashtra President Chandrashekhar Bawankule Announce Elelction Chief For 48 Loksabha Constituency Maharashtra

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Loksabha election 2024 : भाजप निवडणुकीच्या कायम तयारीत असतं असं म्हटलं जातं. 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून तयारी सुरु झाली आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी ही निवडणुक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. त्यातच आज लोकसभा निवडणुकीसाठी निवडणुक प्रमुखांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील प्रमुखांची यादी जाहीर केली आहे. त्यात पुणे लोकसभेची जबाबदारी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या शिरुर लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून भाजपचे आमदार महेश लांगडे यांची निवड करण्यात आली आहे. पवारांच्या बारामतीत राहुल कुल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी जबाबदारी असणार आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून संघटनात्मक मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील 48 लोकसभा मतदार संघाच्या प्रमुखांची घोषणा केली. त्यामध्ये लांडगे यांना शिरुरची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. लोकसभा मतदार संघ दौऱ्याच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री रेणुका सिंह, प्रल्हादसिंह पटेल यांनी गेल्या वर्षभरात शिरूर लोकसभा मतदार संघात दौरे केले आहेत. या सर्व कार्यक्रमांमध्ये लांडगे सक्रीयपणे सहभागी होते. त्यामुळे त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

त्यासोबतच मागील काही महिन्यांपासून पुणे लोकसभेवर राज्याचं लक्ष लागलं आहे. याच पुणे लोकसभेचे निवडणूक प्रमुख म्हणून मुरलीधर मोहोळांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुरलीधर मोहोळ यांचा दांडगा जनसंपर्क आहे आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांच्या सक्रिय सहभाग होता. या निवडणुकीदरम्यान अनेक नेत्यांनी मतदार संघाचे दौरे केले. केंद्रीय मंत्री अमित शहांनीदेखील यांनीदेखील मतदार संघाचा दौरा केला होता. या सगळ्या दरम्यान मुरलीधर मोहोळ सक्रीयपणे सहभागी होते. त्यासोबतच पुणे आणि आजुबाजूच्या गावांमध्येही भाजपची ताकद आहे. त्यांच्यासाठी येत्या निवडणुकीसाठी ही मोठी जबाबदारी असेल. 

पश्चिम महाराष्ट्रातील मतदार संघांचे प्रमुख पुढीलप्रमाणे :
मावळ – प्रशांत ठाकूर
पुणे – मुरलीधर मोहोळ.
बारामती- राहुल कुल 
शिरुर- महेश लांडगे
माढा- प्रशांत परिचारक 
सातारा- अतूल भोसले
सांगली- दिपक शिंदे
हातकणंगले- सत्यजित देशमुख 
कोल्हापूर- धनंजय महाडिक

चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातल्या 48 लोकसभा मतदारसंघांसाठी आणि 288 विधानसभा मतदारसंघांसाठी प्रत्येकी एका निवडणूक प्रमुखाची घोषणा केली आहे. या निवडणूक प्रमुखावर त्या त्या मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळं भाजपनं आगामी निवडणुकांच्या मोर्चेबांधणीसाठी पहिलं पाऊल उचललं आहे. राज्यात दोनशेपेक्षा अधिक आमदार निवडून आणण्याचा निर्धार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते लक्ष्य गाठण्याच्या दृष्टीनं गुरुवारपासून योजना सुरु करत असल्याचं बावनकुळेंनी सांगितलं.

[ad_2]

Related posts