Defeat Of World Champion Ding Liren By R Pragnanandaa Chess Also Overtakes Viswanathan Anand In World Rankings

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

R Pragnanandaa Chess : भारतीय ग्रँड मास्टर प्रज्ञानंदने (R. Pragnanandaa) टाटा स्टील मास्टर्स स्पर्धेत चमकदार कामगिरी करत डिंग लिरेनचा पराभव केला. डिंग लिरेन हा सध्याचा विश्वविजेता आहे. चौथ्या फेरीत त्याला प्रगनानंदने पराभूत केले. या विजयासह प्रज्ञानंदने विश्वनाथन आनंदला मागे टाकले. तो नंबर-1 भारतीय ग्रँड मास्टर बनला आहे. प्रज्ञानंदने गेल्या वर्षीही याच स्पर्धेत डिंगचा पराभव केला होता.

या विजयासह प्रग्नानंदने विश्‍वनाथन आनंदला रेटिंगच्या बाबतीत मागे टाकले आहे. प्रज्ञानंद FIDE च्या लाइव्ह रँकिंगमध्ये 11 व्या क्रमांकावर पोहोचले आहे. त्याचे 2748.3 गुण आहेत. तर विश्वनाथन आनंद 12 व्या क्रमांकावर आहे. त्याला एक जागा गमवावी लागली आहे. आनंदचे 2748.0 गुण आहेत. या यादीत मॅग्नस कार्लसन अव्वल स्थानावर आहे. फॅबियानो कारुआना दुसऱ्या स्थानावर आहे.

प्रज्ञानंदच्या नावावर अनेक विक्रम नोंदवले गेले आहेत. 2016 मध्ये तो सर्वात तरुण आंतरराष्ट्रीय मास्टर बनला. वयाच्या अवघ्या 10 वर्षे 10 महिन्यांत प्रगनानंदने ही कामगिरी केली होती. 2017 मध्ये तो पहिल्यांदा ग्रँड मास्टर झाला. यानंतर 2018 मध्येही यश संपादन केले. प्रगनानंद चेन्नई, तामिळनाडू येथील आहे. त्यांचा जन्म 2005 मध्ये झाला होता. त्याचे वडील रमेशबाबू बँकेत शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत.

त्याने अमेरिकेचा ग्रँडमास्टर फॅबियानो कारुआनाचाही पराभव केला आहे. ऑगस्ट 2023 मध्ये बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी जिंकून त्याने अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रज्ञानंधाने उपांत्य फेरीच्या टायब्रेकमध्ये कारुआनाचा पराभव केला. बुद्धिबळ विश्वचषकाच्या इतिहासात अंतिम फेरी गाठणारा तो दुसरा भारतीय ठरला. याआधी विश्वनाथन आनंदने हा पराक्रम केला होता. अंतिम सामन्यात मॅग्नस कार्लसनकडून प्रग्नानंदाचा पराभव झाला.

इतर महत्वाच्या बातम्या 

[ad_2]

Related posts