Share Market Crash Sensex Falls 1628 Nifty Falls 460 Points Investers Loose 4 7 Lakh Crore Stock Market Marathi News Update

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : गेल्या काही काळापासून सातत्याने वधारत असलेल्या शेअर बाजारासाठी आजचा दिवस (Share Market Update) हा काळा दिवस ठरला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) आज 1,628 अंकांची घसरण झाली, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये (Nifty) 460 अंकांची घसरण झाली. गेल्या 16 महिन्यामधील ही सर्वात मोठी घसरण आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना मात्र 4.5 लाख कोटींचं नुकसान सहन करावं लागलं आहे. 

बँकिंग आणि वित्तीय समभागांच्या विक्रमी घसरणीने शेअर बाजाराचे कंबरडे मोडले. आज बाजारातील घसरणीचे सर्वात मोठे कारण म्हणजे HDFC बँकेतील मोठी घसरण. सेन्सेक्सच्या 1600 अंकांच्या घसरणीत एकट्या HDFC बँकेच्या 950 अंकांची म्हणजे साडे आठ टक्क्यंची घसरण झाली. बँकेच्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर ही मोठी घसरण आहे. 

आजचा दिवस सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हींसाठी सुमारे दीड वर्षातील सर्वात वाईट दिवस ठरला. यापूर्वी देशांतर्गत बाजारात जून 2022 मध्ये अशी घसरण दिसून आली होती. बाजारातील एवढ्या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे आजच 4.7 लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे.

सकाळपासूनच बाजारात घसरण सुरू

बुधवारी सकाळपासून BSE सेन्सेक्स आणि NSE निफ्टी दोन्ही मोठ्या घसरणीचे संकेत देत होते. दोघांची सुरुवात प्रत्येकी एक टक्का घसरणीने झाली. दिवसाचा व्यवहार जसजसा वाढत गेला तसतसा बाजारातील तोटा वाढत गेला. व्यवहाराच्या समाप्तीपर्यंत, सेन्सेक्स आणि निफ्टीचा तोटा 2.25 टक्क्यांवर पोहोचला होता, जो देशांतर्गत शेअर बाजारातील एका दिवसातील सर्वात मोठी घसरण आहे.

सेन्सेक्सचे एवढे मोठे नुकसान

एका दिवसापूर्वी सेन्सेक्स 73,128.77 अंकांवर होता. आज त्याने 71,998.93 अंकांवर मोठ्या तोट्यासह सुरुवात केली. व्यवहार संपल्यानंतर सेन्सेक्स 1628.01 अंकांनी म्हणजेच 2.23 टक्क्यांनी घसरला आणि 71,500.76 अंकांवर बंद झाला. 

आयटी समभाग वगळता सर्व शेअर्समध्ये घसरण

सेन्सेक्स कंपन्यांमध्ये, केवळ टेक स्टॉक्सने बाजाराला काही प्रमाणात आधार दिला. एचसीएल टेक सर्वाधिक 1.34 टक्क्यांनी मजबूत झाला. इन्फोसिस 0.55 टक्के, टेक महिंद्रा 0.54 टक्के आणि टीसीएस 0.38 टक्के वधारले तर दुसरीकडे एचडीएफसी बँक सर्वाधिक साडेआठ टक्क्यांनी घसरली. टाटा स्टील 4 टक्क्यांहून अधिक घसरले. कोटक बँक, अॅक्सिस बँक, आयसीएआय बँक, जेएसडब्ल्यू स्टील आणि बजाज फिनसर्व्हचे समभाग 2.38 टक्क्यांनी 3.66 टक्क्यांनी घसरले.

निफ्टीतही मोठी घसरण

निफ्टी 50 बद्दल बोलायचे तर हा निर्देशांक 459.20 अंकांनी (2.08 टक्के) घसरून 21,571.95 अंकांवर बंद झाला. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये, निफ्टी बँक आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस दोन्ही 4.28 टक्क्यांनी घसरले. फक्त निफ्टी आयटी 0.64 टक्क्यांनी किंचित वाढला. निफ्टी आयटी आणि निफ्टी रियल्टी सारख्या क्षेत्रांमध्येही 1-2 टक्क्यांनी घसरण झाली.

निफ्टी बँकमध्ये 2000 अंकांची घसरण

बँक निफ्टीमध्ये आज सुमारे 2000 अंकांची घसरण दिसून आली. मार्च 2022 नंतर बँक निफ्टी निर्देशांकातील ही सर्वात मोठी एकाच दिवसातील घसरण आहे. 

ही बातमी वाचा: 

[ad_2]

Related posts