Maratha Reservation Will Go To Mumbai Government Under Illusion Manoj Jarange Warning Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मुंबईत आंदोलनासाठी जाणारच असून, सर्व तयारी झाली आहे. सरकार आम्हाला धोका देत आहे, त्यामुळे आम्ही खूप सावध झालो आहेत. तसेच, सरकारला भ्रमात ठेवणार अन् गनिमी कावाने मुंबई गाठणार आहोत. अचानक लाखो लोकं येतील आणि तुम्ही देखील पाहत राहताल असे मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले आहेत. आंतरवाली सराटीमध्ये (Antarwali Sarathi) पत्रकार परिषेदत ते बोलत होते. 

दरम्यान यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, “गोडीने गुलाबीने तोडगा काढा, हे आंदोलन बंद पडणार नाही. शिष्टमंडळ आणि दुरुस्ती एवढंच मला पाठ झालय. त्यांच्याकडून त्रुटीच निघेना आणि उगच हिंडत आहेत. मी मॅनेज होत नाही हे तुमचं (सरकार) दुखणे आहे. पूर्वीचा मराठा राहिला नाही, आता देशव्यापी आंदोलनाची मागणी आहे. शिष्टमंडळाचा देखील आता कंटाळा आलाय, असे जरांगे म्हणाले. 

मराठे काय असतात ते 26 जानेवारीला बघा…

54 लाख नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र दिल्या शिवाय माघार नाही. 20 ला मुंबईला जाणारच, आरक्षण दिले तर गुलाल घेऊन जाऊ आणि नाही दिले तर आरक्षणासाठी जाणार आहोत. मी प्रामाणिक आणि संयमाने आंदोलन चालू ठेवले आहे. समाजाने 7 महिने वेळ दिला आहे. आता 20 जानेवारी आमच्या तयारीसाठी वेळ होता, पण त्यांच्यासाठी देखील हा वेळच होता. त्यामुळे आता मराठे काय असतात ते 26  जानेवारीला बघा असा इशारा देखील जरांगे यांनी दिला आहे. 

गनिमी कावाने मुंबईला पोहचवून आंदोलन करणार 

सरकार आम्हाला धोका देत आहे, पण सरकारला आम्ही भ्रमात ठेवणार आहे. आम्ही खूप सावध आहोत. आम्ही आता गनिमी कावाने मुंबईला पोहचवून आंदोलन करणार आहे. फोन आला नाही म्हणून नका, स्वतः होऊन पुढे या आणि आंदोलनात सहभागी व्हा असे आवाहन जरांगे यांनी मराठा समाजाला केले आहेत. तसेच, राज्यातील संपूर्ण मराठा समाजाच्या आमदार-खासदार यांनी देखील या आंदोलनात सहभागी व्हावेत. अन्यथा यांना लक्षात ठेवा कोण आपला आंदोलनात आले नाही, असे जरांगे म्हणाले आहेत. 

तुमचा सुपडा साफ करू

“सरकारकडून मराठ्यांची फसवणूक होत आहे. सरकार असंच वागत राहीलं तर आम्ही तुमचा सुपडा साफ करू असा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे. प्रशासनाचे अधिकारी जाणूनबुजून प्रमाणपत्र देत नाहीत. आता 20 जानेवारीला मुंबईला जाणार म्हणजे जाणारच, थांबणार नाही असं मनोज जरांगे म्हणाले. शिष्टमंडळाचा कंटाळा आलाय. बच्चू कडू यांच्यावर विश्वास टाकलाय, सुरवातीला आलेले चार मंत्री कुठे गायब झालेत माहिती नाही. गिरीश महाजन तर पुन्हा आलेच नाही,” अशी टीका जरांगेंनी केलीय. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

मोठी बातमी! राज्यात 54 लाख कुणबी नोंदी मिळाल्या, तात्काळ प्रमाणपत्र देण्याचे आदेश

[ad_2]

Related posts