OpenAI CEO Sam Altman Meets PM Modi And Discussed With Amitabh Kant In India Check Complet Details Tech News Marathi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

OpenAI : सध्या जगभर कृत्रिम बुद्धीमत्तेच्या तंत्रज्ञानावरून प्रचंड चर्चा केली आहेत. अशातच आता ओपनएआयचे (OpenAI) सीईओ सॅम अल्टमॅन (Sam Altman) भारतामध्ये आले आहेत.गेल्या बुधवारी ते भारतात दाखल झाले आहेत. अल्टमॅन पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Pm Modi) भेट घेणार आहेत. भारतात चॅटजीबीटीला (ChatGPT) मिळणारा सकारात्मक प्रतिसाद आहे. याबद्दल अल्टमॅन यांनी आनंद व्यक्त केला आहे. ‘इकॉनॉमिक्स टाईम्स’च्या बातमीनुसार, सॅम अल्टमॅन यांनी सांगितले की, खऱ्या  अर्थाने भारताकडून चॅटजीपीटीचा स्वीकार करण्यात आला. येथील युजर्सनी चॅटजीबीटीला खूप लवकर स्वीकारले आहे.

पंतप्रधान मोदींची घेणार भेट 

बुधवारपासून सीईओ सॅम अल्टमॅन भारतात मुक्कामी आहेत. अल्टमॅन पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घेणार आहेत. या भेटीच्या आधीच अल्टमॅन यांनी सांगितले की, भारताने राष्ट्रीय तंत्रज्ञान आणि राष्ट्रीय संपत्तीच्या बाबतीत खूप जबरदस्त कार्य केलं आहे. त्यांनी सांगितले की, या तंत्रज्ञानाला दुसऱ्या सेवा क्षेत्राशी कसं जोडून घेता येईल,यावर भारताने लक्ष केंद्रित करायला हवं. ते पुढे म्हणाले की, आम्ही सर्व सरकारी सेवांना आणखीन चांगले करण्यासाठी   लँग्वेज-लर्निंग मॉडलच्या (LLM) तंत्राचा वापर करण्यात येईल.  

गैरसमज करणार दूर 

एका वृत्तानुसार, सीईओ सॅम अल्टमॅन यांनी सांगितले की, सध्या तरी ओपनएआयकडून  GPT 5  व्हर्जनबद्दल कोणतंही प्रशिक्षण दिलं जात नाही. यावर त्यांचं म्हणणे आहे की, या व्हर्जनची  सुरूवात करण्यापूर्वी खूप काम करायचं आहे. अल्टमॅन यांनी सांगितले की, चॅटजीबीटीशी संबंधित जे गैरसमज आहेत ते दूर करण्याची आवश्यकता आहे. कंपनी युजर्सना जास्तीत जास्त नियंत्रण कसं देता येईल, यावर काम करत आहे. कारण कोणत्याही युजर्सला चॅटजीपीटीमध्ये पक्षपात केल्याचं वाटता काम नये.   

नीती आयोगाचे माजी अध्यक्ष अमिताभ कांत याची घेतील भेट 

सॅम अल्टमॅन गेल्या बुधवारीच अमिताभ कांत (Amitabh Kan) यांची भेट घेतली आहे. या भेटी दरम्यान त्यांनी सॅम अल्टमॅन (Sam Altman) यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटिलिजन्सच्या क्षमतांवर चर्चा केली. यावेळी उदयोन्मुख अर्थव्यवस्था असणारे देश त्यांच्या नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी जनरेटिव्ह एआयचा कसा फायदा घेऊ शकतात, यावर चर्चा केली आहे. असे अमिताभ कांत यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. 

इतर बातम्या वाचा :

Artificial Intelligence : ChatGPT चे CEO Sam Altman यांच्याकडून कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्याची चिंता व्यक्त, सरकारने हस्तक्षेप करण्याचं आवाहन



[ad_2]

Related posts