Pune Crime Task Froud Retired Colonel Swindles 25 Crores In Task Fraud What Is Task Fraud

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Crime Task Froud : दिलेला टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा देण्याच्या नावाखाली पैसे गुंतविण्यास सांगून सायबर चोरांनी एका रिटायर्ड कर्नलला तब्बल अडीच कोटी रुपयांना गंडा घातला. ही घटना आयटी हब म्हणून ओळख असलेल्या पुण्यात घडली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने पुण्यात टास्क फ्रॉडने लोकांचे बँक अकाऊंट रिकामे केले आहेत. त्यातच या कर्नलला तब्बल एक दोन नाहीतर अडीच कोटींचा गंडा घातला आहे. 

याबाबत एका 71 वर्षांच्या कर्नलने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांना व्हॉट्सअॅपवर ऑनलाइन रिव्ह्यू लिहिण्यापासून तसेच व्हिडीओला लाइक करून जास्त पैसे मिळवण्याचा मेसेज आला होता. सुरुवातीला त्यांच्या खात्यात काही पैसे जमा झाले त्यामुळे त्यांचा विश्वास बसला. त्यानंतर त्यांच्याशी चॅटिंग सुरू केले. त्यांना प्री-पेड टास्क स्कीममध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. कर्नल यांनी चोरांच्या सांगण्याप्रमाणे 18 वेगवेगळ्या खात्यात पैसे भरत गेले. आपली फसवणूक होत आहे हे लक्षात आलं. मात्र, त्यापूर्वी त्यांचे खिसे रिकामे झाले होते. 

नेमकं टास्क फ्रॉड काय आहे ?

टास्क, लाइक, सबस्क्राइब आणि रिव्ह्यू देण्याच्या नोकरीचे प्रलोभन दाखवून ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे गेल्या काही महिन्यांपासून वाढले आहेत. अनेकांनी नवीन नोकरी शोधण्यासाठी अनेक वेबसाइटसवर नोंदणी केलेली असते. त्यातील डेटाचा वापर करून मोबाइल क्रमांकावर पार्ट टाइम नोकरीचे मेसेज पाठवले जातात. मेसेजमधील लिंकवर क्लिक करताच व्हॉटसअॅप किंवा समाजमाध्यमावरील अकाऊंट सुरू होते. व्हॉटसअॅप किंवा टेलिग्रामच्या ग्रुपवर सदस्य असलेले अनेकजण घरबसल्या दररोज अधिक नफा कमावता येईल हे पटवून देतात. आता पुण्यासारख्या ठिकाणी एका निवृत्त लष्कर अधिकाऱ्याचे तब्बल अडीच कोटी रुपये अशाच पद्धतीने लंपास करण्यात आले. 

फसवणूक कशी केली जाते ?

– सुरुवातीला व्हॉट्सॲपद्वारे नोकरीबाबतचा संदेश पाठवला जातो. 
– त्या संदेशातील लिंक क्लिक केल्यानंतर सुरुवातीला काही फोटो लाइक करायला सांगितले जाते. 
– ते केल्यानंतर 500 ते 1000रुपये खात्यात जमा केले जातात.
– अशा प्रकारे विश्वास संपादन करून मोठ्या गुंतवणुकीचे आमिष दाखवले जाते. 
– त्याला बळी पडल्यानंतर गुंतवणूक करण्यास सांगितले जाते. 
– त्याबद्दल थोडा मोबदलाही दिला जातो
– अशा पद्धतीने तुम्ही त्यांच्या जाळ्यात सपडता

 
गेल्या 1 वर्षात सायबर गुन्हा संदर्भात 20 ते 22 हजार तक्रार सायबर पोलिसात दाखल होतात. घर बैठे पैसे कमाओ हे अगदी सोपे वाक्यांना अनेक लोक बळी पडतात. पैसे मिळत असल्याने सायबर चोरांच्या जाळ्यात देखील अडकतात. त्यामुळे अशा कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. 

[ad_2]

Related posts