ravikant tupkar arrested by buldhana police before rail roko protest at malkapur station maharashtra marathi news 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

बुलढाणा: शेतकरी हिताचे निर्णय न घेतल्यास 19 तारखेपासून मुंबई-दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वे रोखू असा इशारा देणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांना (Ravikant Tupkar) बुलढाणा पोलिसांनी अटक केली आहे. सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव तसेच शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी रविकांत तुपकर विविध आंदोलनं करत आहेत. याबाबतीत शासन स्तरावर त्यांची बैठकसुद्धा झाली. परंतु आपल्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत रविकांत तुपकरांनी शुक्रवारी मलकापूर रेल्वे स्टेशनवर रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र त्याआधीच त्यांना अटक करण्यात आली आहे. 

रेल रोको आंदोलन करण्यापूर्वीच पोलिसांनी शेतकरी नेते रविकांत तुपकरांना घेतले ताब्यात

सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव तसेच शेतकऱ्यांच्या इतर मागण्यासाठी मागील ऑक्टोबर महिन्यापासून शेतकरी नेते रविकांत तुपकर विविध आंदोलने करत आहे. याबाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांची बैठकही झाली होती. परंतु त्यानंतरही आपल्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप रविकांत तुपकरांनी केला. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी रेल रोको आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं. 

मुंबई-दिल्लीकडे जाण्याऱ्या रेल्वे रोखू, रविकांत तुपकरांचा इशारा

लातूर जिल्ह्यातील औसा येथे पार पडलेल्या शेतकरी आणि निराधार महिला मोर्चामध्ये  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सरकारला अल्टिमेटम दिला होता. 18 जानेवारीपर्यंत शेतकरी हिताचे निर्णय घ्या, अन्यथा मुंबई-दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वे रोखू असा इशारा तुपकर यांनी दिला. औसामध्ये शेतकरी महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चासाठी जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती. 

मागील अनेक दिवसापासून शेतकरी हिताचे निर्णय होताना दिसत नाहीत. सरकारला शेती आणि शेतकऱ्याच्या प्रश्नाचे गांभीर्य राहिले नाही. यामुळे गावगाडा उद्ध्वस्त होत असल्याचं तुपकर म्हणाले. ते म्हणाले की, शेतमालाला भाव नाही, सोयाबीन आणि कापसाचा दरावरून आपणास हे लक्षात येईल. पाण्याचा आणि विजेचा प्रश्न गंभीर आहे. विम्याची रक्कम वेळेवर मिळत नाही. जो विमा मंजूर झालाय तो अत्यल्प आणि तुटपंजा आहे. आमच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला तरच शेतकरी सक्षम होईल.

ही बातमी वाचा: 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts