Congress Babasaheb Thorat On Pune Loksabha Bypoll Election | Pune Lok Sabha : कुणी काहीही दावा केला तरी पुणे लोकसभेची पोटनिवडणूक काँग्रेसच लढणार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Loksabha Bypoll : पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेच्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. या जागेवरून आता महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचे दिसतेय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पुणे लोकसभा निवडणुकीवर दावा केला होता. त्यानंतर आता काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी लोकसभेची पोटनिवडणूक काँग्रेसच लढणार असल्याचे स्पष्ट सांगिलेय. कुणी काहीही दावा केला तरी पुणे लोकसभेची पोटनिवडणूक काँग्रेसच लढणार, असे वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी आज सांगितले.  

पुणे लोकसभेत कोणत्या पक्षाची ताकद जास्त ?

आमची मविआ आहे, यात ताकद जास्त कोणाची यापेक्षा पारंपरिक पद्धतीने कोण निवडणूक लढत आलं. चर्चा होत असते आम्ही बैठकीत निर्णय घेऊ. आता कसबा विधानसभा आम्ही लढलो सर्वांचं सहकार्य झालंच, हे आम्ही नाकारत नाही. तसंच ही लोकसभा आम्ही लढवू आणि सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं. अशीच विनंती आमची राहील.

अजित पवार म्हणतात पुणे लोकसभा राष्ट्रवादीचं लढवेल, थोरात काय म्हणाले ? –

पुणे लोकसभा राष्ट्रवादीचं लढवेल, असा दावा अजित पवार यांनी केला होता. याबाबत थोरात यांना प्रश्न विचारला… त्यावर ते म्हणाले की, ही चर्चा होते, अगदी बैठकीत ही हा मुद्दा होईल. मात्र पारंपरिक पद्धतीने जो लढत आलाय, त्यानेच तो लढवावा आणि त्यावर आम्ही ठाम राहू. आत्ता ही 48 लोकसभेबाबत ही तीच चर्चा आहे. पारंपरिक पद्धतीनेच लढली जाईल.

मावळ लोकसभा काँग्रेस लढणार? 

तसं काही नाही, आम्ही 48 लोकसभेबाबत चर्चा करतोय. त्यात काही कार्यकर्ते म्हणतात ही जागा काँग्रेसला घ्या, तो कार्यकर्ता मीडियाला येऊन सांगतो आणि तशा बातम्या चालतात. मात्र तूर्तास त्या चर्चांमध्ये तथ्य नाही. लवकरच एकत्र बसून जागा वाटप होईल, असे थोरात म्हणाले. 

 पालिकांपेक्षा लोकसभा निवडणूक महत्वाची –

लोकसभा निवडणूक ही येत्या काळात खूप महत्त्वाची राहणार आहे. त्यानंतर विधानसभा निवडणूकही येत आहे. तत्पूर्वी कदाचित महापालिकेची निवडणूक लागेल. मात्र लोकसभाच महत्वाची आहे ही वस्तुस्थिती आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. 

नितेश राणेंचे शरद पवार वक्तव्य, थोरात काय म्हणाले ?

राजकारणाचा स्तर इतका खालावला आहे की आम्ही टीव्ही पाहणं बंद करतोय. कोणीतरी काही बोलावं आणि ते संपूर्ण जनतेने पाहावं. आता हे जर आचारसंहिता पाळत नसतील तर किमान चॅनेल ने तरी आपली एक आचारसंहिता बनवावी. अशी उलट माझी मागणी आहे. तुम्हीच अशा बातम्या दाखवू नयेत. कोणी कोणाबद्दल काय बोलावं याचं काही तारतम्य बाळगायला हवं. संसदेतील माझ्या चाळीस वर्षाच्या कारकिर्दीतील हा सर्वात खालावलेला काळ आहे, थोरात म्हणाले.

[ad_2]

Related posts