pune metro son and mother collapse on Metro track Two lives saved as security guard pressed the emergency button in a moment

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पुणे मेट्रो स्थानकात सुरक्षारक्षकांने प्रसंगावधान दाखवून आपत्कालीन बटन दाबल्याने मोठा अनर्थ टळला. पुणे मेट्रो सुरक्षा रक्षक विकास बांगरने प्रसंगावधान राखत तीन वर्षीय मुलगा व त्याच्या आईचे प्राण वाचवले. आज (19 जानेवारी) दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. सुरक्षारक्षक विकास बांगरने दाखवलेल्या समयसूचकतेबद्दलआणि धाडसी कार्याबद्दल पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनवणे व महाव्यवस्थापक सोमेश शर्मा (वित्त) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

नेमका प्रसंग काय घडला?

पुणे मेट्रोच्या सिव्हिल कोर्ट उन्नत मेट्रो स्थानकात फलाट क्रमांक दोनवरून एक तीन वर्षाचा मुलगा खेळत खेळता अचानक मेट्रोच्या रुळावर जाऊन कोसळला. यावेळी पडणाऱ्या मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात मुलाची आई देखील रुळावर कोसळली. यावेळी कामावर असलेल्या विकास बांगर या सुरक्षारक्षकाने मुलाला ट्रॅकवर पडताना पाहिले. यानंतर क्षणाचाही विलंब न करता प्रसंगावधान राखत फलाटावरील आपत्कालीन मेट्रो थांबविण्याचे प्लंजर (ई.एस.पी) बटन वेळीच दाबले. 

अन् वेगात येणाऱ्या  मेट्रो त्वरित थांबल्या 

मेट्रो थांबविण्याचे प्लंजर दाबल्याने रेल्वे स्थानकाच्या दोन्ही दिशांनी वेगाने येणाऱ्या मेट्रो ट्रेन त्वरित थांबल्या गेल्या. यावेळी स्थानक आणि मेट्रो यामधील अंतर केवळ ३० मीटर इतके होते. मेट्रो ट्रेन थांबल्यानंतर मुलगा व त्याच्या आईला सुखरूपरुळांवरून बाहेर काढण्यात आले व परिवाराशी भेट करून देण्यात आली.  

विकास बांगरचा सत्कार 

सुरक्षारक्षक विकास बांगरने दाखवलेल्या समयसूचकतेबद्दलआणि धाडसी कार्याबद्दल पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनवणे व महाव्यवस्थापक सोमेश शर्मा (वित्त) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी स्थानक नियंत्रक व पुणे मेट्रोचे कर्मचारी उपस्थित होते. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts