Ajit pawar on pm modi emotional speech solapur marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : सोलापुरातील कार्यक्रमावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) भावूक झाले होते. त्यानंतर विरोधकांनी यावर टीकास्त्र सोडलं होतं. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुण्यात प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी आता माणूस आहे, भावुक होणार. जुने दिवस त्यांना आठवले त्यामुळं ते भावुक झाले, असे उत्तर दिले. त्याशिवाय त्यांना पडता काळही आठवला. मी पण आधी पत्र्याच्या, सारवलेल्या घरात राहायचो, आता बंगल्यात राहतो, असे अजित पवार म्हणाले. ते पुण्यात बोलत होते. 

आता तुम्ही जर पत्र्याच्या घरात, छोट्याश्या घरात राहिला असाल. त्यांना त्यांची त्यावेळची अवस्था आठवली असेल आणि पंतप्रधान झाल्यावर आपण अनेकांना घरं देतोय. हे पाहून भावुक झाले असतील. मी पण आधी पत्र्याच्या घरात, सारवलेल्या घरात राहायचो, नंतर बंगला झाला. काळानुरूप परिस्थिती बदलत असते. आता मोदी पंतप्रधान आहेत, मात्र पूर्वीचे दिवस कोणीच विसरत नाही. ते आज त्यांना आठवलं असेल, म्हणून ते भावुक झाले असावेत, असे अजित पवार म्हणाले. 

मोदींच्या दौऱ्यावर टीका करतेत व्हय? ह्यांच्या का पोटात दुखतंय – 

गर्दी झाली म्हणून टीका करतेत व्हय. एवढी प्रचंड गर्दी, काय सांगू तुला. आता माणूस आहे, भावुक होणार. जुने दिवस त्यांना आठवले त्यामुळं ते भावुक झाले. घरं चांगली झालीत. कष्टाळू, गरजूंना घरं मिळाली. पंतप्रधान मोदींच्या हस्तेच भूमिपूजन झालं तेंव्हा घरं माझ्या हाताने वितरित होणार, असं त्यांनी बोलून दाखवलं होतं. तो शब्द खरा ठरला. विरोधकांच्या पोटात का दुखतंय, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. 

सहकार चळवळ मजबूत करण्यासाठी विश्वासहर्ता जपण्याची गरज

महाराष्ट्रात सहकार क्षेत्रामुळे विविध बदल झाले आहेत. सहकार चळवळ मजबूत करण्यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या संचालक मंडळांनी विश्वासहर्ता जपली पाहिजे. बँकेचे कामकाज करतांना ठेवीदारांच्या विश्वासाला तडा जाता कामा नये, ही काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. कर्जदारांनीदेखील वेळेत कर्ज परत करावे. यामुळे या क्षेत्रात आर्थिक शिस्त लागण्यास मदत होईल. सहकार क्षेत्राला आणखीन मजबूत करण्यासाठी एकत्रित काम करण्याचे आवाहन करून या क्षेत्रातील अडी अडचणी सोडण्यासाठी शासन सहकार्य करेल, असे अजित पवार म्हणाले.

पुणे मर्चंटस को-ऑप बँकेची शतक महोत्सवी वर्षातील वाटचाल सहकार क्षेत्रातील महत्वाचा टप्पा

पुणे मर्चंटस को-ऑप बँकेला शतक महोत्सवी वर्षात पदार्पण केल्याबद्दल शुभेच्छा देतांना ते म्हणाले, या बँकेच्या वाटचालीमध्ये बँकेच्या आजी-माजी अध्यक्ष, संचालक, अधिकारी, कर्मचारी यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. शतक महोत्सवी वर्षातील वाटचाल सहकार क्षेत्रातील महत्वाचा टप्पा असून  बँकेने आणखीन खूप मोठा टप्पा गाठायचा आहे. बँकेचे कार्यक्षेत्र राज्यस्तरीय करण्याबरोबरच छोट्या व्यवसायिकांना, तरुणांना तसेच पत नसलेल्याही कर्ज देण्याबाबत संचालक मंडळांनी विचार करावा. शतक महोत्सवी वर्षात विविध लोकाभिमुख काम करावे, असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले. 

शहरातील विकासकामे जलद गतीने मार्गी लावण्याचा प्रयत्न

सर्वांना विश्वासात घेऊन शहरात विविध विकासकामे करण्यात येत असून ही कामे जलद गतीने मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या कामांमुळे शहरात प्रदूषण वाढत असून काम करतांना संबंधितांनी याबाबत खबरदारी घ्यावी. नागरिकांनी याबाबत सूचना असल्यास प्रशासनाला कळवाव्यात, असे आवाहन पवार यांनी केले. 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts