daily rashi bhavishya daily horoscope today rashi bhavishya 9 June 2023

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Horoscope 9 June 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

मेष (Aries)

आजच्या दिवशी तुमचे शत्रू तुमची निंदा करतील. घरातील लोक तुमच्या उद्धट स्वभावावर टीका करण्याची शक्यता आहे.

वृषभ (Taurus)

आजच्या दिवशी तब्येतीच्या बाबतीत हलगर्जीपणा करु नका. भविष्यातील गोष्टींवर विचार करावा लागणार आहे.

मिथुन (Gemini)

आजच्या दिवशी अतिरिक्त खर्च मनाला त्रास देणार आहे. जोडीदाराच्या भावनांचा विचार करा. करियरमध्ये प्रगतीसाठी प्रयत्नशील राहा.

कर्क (Cancer)

आजच्या दिवशी वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे. घाईमुळे कामं बिघडण्याची शक्यता दाट आहे.

सिंह (Leo)

आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी जास्त काम केल्याने मानसिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे.

कन्या (Virgo)

आजच्या दिवशी तुम्हाला काही नवीन संधी मिळू शकतात. तुम्ही नोकरीसाठी अर्ज केला असेल तर आज यश मिळू शकतं.

तूळ (Libra)

या राशीच्या व्यक्तींना कुटुंबातील सदस्याच्या तब्येतीची काळजी करावी लागणार आहे. दिवस तुमच्यासाठी मध्यम फलदायी राहणार आहे. 

वृश्चिक (Scorpio)

आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या व्यवसायाबद्दल काळजी वाटू शकते. आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा गोंधळात टाकणारा असणार आहे. 

धनु (Sagittarius)

आजच्या दिवशी नवीन व्यवसाय योजनेवर काम करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. प्रेमसंबंधांमध्ये संवेदनशीलता दिसून येणार आहे. 

मकर (Capricorn)

आजच्या दिवशी तुमची मेहनत आणि नशीब प्रत्येक प्रकारे चांगले प्राप्त होणार आहे.बुद्धिमत्ता आणि हुशारी दाखवून तुम्ही तुमची कामे सहज पूर्ण करणार आहात.

कुंभ (Aquarius)

आजच्या दिवशी कोर्टाशी संबंधित काही समस्या असतील तर तुम्हाला त्यामध्ये सुटका होण्याची शक्यता आहे. तुमच्या घरात कोणतेही शुभ कार्य पूर्ण होणार आहे.

मीन (Pisces)

आजच्या दिवशी तुमच्या हातात जे काही काम कराल त्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. तुम्हाला तुमच्या योजनांमध्ये अपेक्षित यश नक्कीच मिळणार आहे. 

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts