oneplus buds 3 listed on amazon before offcial launch price health features and battery backup

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

 OnePlus Buds Launch: 23 जानेवारीला वनप्लस  (OnePlus )भारतासह जगभरात वनप्लस 12 सीरिज लाँच करण्याच्या तयारीत आहे. या सीरिजमध्ये वनप्लस 12 आणि वनप्लस 12 आर लाँच होण्याची शक्यता आहे. याशिवाय कंपनी या लाँच इव्हेंटमध्ये वनप्लस बड्स  3 (OnePlus Buds 3) देखील लाँच करणार आहे, ज्याचे नाव वनप्लस बड्स 3 आहे. मात्र, या बड्सच्या अधिकृत लाँचिंगपूर्वीच अॅमेझॉनवर लाँच करण्यात  हे बड्स आले आहे. वनप्लसचे हे नवे बड्स तुम्ही अॅमेझॉन इंडियाच्या वेबसाईटवर पाहू शकता. ज्यामुळे या इयरबड्सची वैशिष्ट्ये समोर आली आहेत. 

वनप्लसच्या या नवीन इयरबड्सच्या सर्व फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल जाणून घेऊया. अॅमेझॉनवरील लिस्टिंगमध्ये युजर्संना या इयरबड्समध्ये 44 तासांचा बॅटरी बॅकअप मिळणार आहे. यात क्विक चार्जिंगची सुविधा असेल आणि युजर्स केवळ 10 मिनिटांच्या क्विक चार्जिंगनंतर पुढील 7 तास या बड्सचा वापर करू शकतील. 

वनप्लस बड्स 3 मध्ये टच कंट्रोल असण्याची शक्यता आहे. युजर्स वनप्लसच्या या नवीन इयरबड्सला फिरवून व्हॉल्यूम कमी किंवा वाढवू शकतील. मात्र, वनप्लस कंपनी नवीन स्मार्टफोन सीरिजसह 23 जानेवारीला भारतात आपले इयरबड्स लाँच करणार आहे, पण वनप्लसने हे प्रॉडक्ट्स यापूर्वीच चीनमध्ये लाँच केले आहेत
 

OnePlusच्या नवीन इयरबड्सची फिचर्स

  • या इयरबड्सचे वजन 4.5ग्रॅम असेल.
  • हा हलक्या वजनाचा इयरबड्स असेल.
  • याचे इन-ईयर विद स्टेमसोबत तयार करण्यात आले आहे.
  • चार्जिंग केस लहान आहे, आणि आयताकृती आकारात बनविली गेली आहे.
  • बाकी इयरबड्सप्रमाणेच चार्जिंग केससमोर युजर्सना इयरबड्सची बॅटरी स्टेटस सांगण्यासाठी इंडिकेटर्सही देण्यात आले आहेत.
  • वनप्लस बड्स 3 च्या चिनी मॉडेलमध्ये मजबूत आवाजासाठी अल्ट्रा-क्लिअर कोएक्सियल ड्युअल युनिट Technology चा वापर करण्यात आला आहे.
  • यात 49 डीबी अॅक्टिव्ह नॉइस कॅन्सलेशन फीचर देण्यात आले आहे.
  • यात ब्लूटूथ 5.3 कनेक्टिव्हिटी आहे.
  • पाण्यापासून बचाव करण्यासाठी याला आयपी 55 रेटिंगही देण्यात आले आहे.
  • यात फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे.
  • चीनमध्ये या इयरबड्सची किंमत 449 युआन म्हणजेच जवळपास 5300 रुपये आहे. आता कंपनी भारतात आपले प्रॉडक्ट किती किंमतीत आणि कोणत्या फीचर्ससह लाँच करते हे पाहावे लागेल.

इतर महत्वाची बातमी-

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts