Narayan Rane Bjp Leader reaction on Ram Mandir said Prime Minister Modi took up the issue of Ram Temple and made it successful detail marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

सिंधुदुर्ग : ‘500 वर्षात राम मंदिराचा (Ram Mandir) मुद्दा कोणी हाती देखील घेतला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राम मंदिराचा मुद्दा हाती घेतला आणि यशस्वी देखील केला. राम आणि पंतप्रधान मोदी आमचे दैवत आहेत.  तसेच उद्या रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना देखील करणार आहेत’, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली. अयोध्येत रामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वेंगुर्ले येथील सातेरी मंदिरात स्वच्छाता केली. 

राम आणि पंतप्रधान मोदी आमचे दैवत असल्याची प्रतिक्रिया देखील नारायण राणे यांनी यावेळी दिली. मोदींनी देशात आर्थिक प्रगती सोबत सांस्कृतिक आणि धार्मिक प्रगती देखील केली असल्याचं यावेळी नारायण राणेंनी म्हटलं. सध्या देशात राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळतोय. त्याच पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी म्हटलं की, हिंदू धर्मात सण येतो तेव्हा घरामध्ये स्वच्छता केली जाते. अयोध्येत रामलल्ला येत असल्याने देशातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता केली जातेय. 

एक ना धड भराभर चिंध्या – नारायण राणे

नितीश कुमार भाजपसोबत जाण्याची शक्यता असल्याने काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे नितीश कुमार हे जुने नेते आहेत. काँग्रेसकडे आता काही राहिलं नाही. नितीश कुमार यांना माहिती आहे कोणाबरोबर गेल्यानंतर देशाची प्रगती होते. काँग्रेस मोदींची पराभव करण्यासाठी एकत्र येतायत, मात्र देशासाठी काय करणार हे सांगत नाही. मागच्या 70 वर्षात त्यांनी काही केलं नाही. काँग्रेस आणि इतर पक्ष एकत्र येतायत, हे म्हणत एक ना धड भाराभर चिंध्या, अशी स्थिती आहे, असंही राणे म्हणालेत. 

ते मोदींमुळे शक्य झालं – नारायण राणे

मागील 500 वर्षात जे शक्य झालं नाही. ते आता 2024 मध्ये मोदींमुळे शक्य झालंय. त्यामुळे इथे पक्ष, जात, धर्म बाजूला ठेवून आपला राम येतोय. आता त्याची प्रतिष्ठापना होतेय, याचा आनंद आपल्याला सर्वांना असायलाच हवा. राम हा राजकारणाचा विषय नाही आहे. राम सर्वांचा आहे, मंदिरात कुठेही लिहून ठेवलं नाहीये, यांनाच मंदिरात प्रवेश आहे. त्यामुळे सर्वांनी यावं आणि रामाचं दर्शन घ्यावं, असं म्हणत नारायण राणे यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. 

हेही वाचा : 

मुंबई मॅरेथाॅनमध्ये गैरसोयीचा कळस; धावलेल्या धावपटूंना पदके नाहीच, आहे ती पदके पोलिस बंदोबस्तात देण्याची वेळ

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts