Shoaib Akhtar Want Virat Kohli to Score 100 centuries Break Sachin Record News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shoaib Akhtar On Virat Kohli : टीम इंडियाचा युवा चिकू ते वर्ल्ड क्लास फलंदाज… असा भन्नाट प्रवास करणाऱ्या विराट कोहलीने अनेक विक्रमांची मोडतोड केली आहे. वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीने सचिन तेंडूलकरचा वनडे सेंच्यूरीचा रेकॉर्ड मोडून नवी बादशाहत काबीज केली. अशातच आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. विराट कोहलीने 100 शतकं ठोकावीत, अशी इच्छा देखील शोएबने व्यक्त केली आहे.

काय म्हणाला Shoaib Akhtar ?

सचिन तेंडुलकर त्यावेळी फक्त एका चेंडूने खेळायचा आणि त्यामुळे चेंडू खूप रिव्हर्स स्विंग व्हायचा. आज सचिन खेळला असता तर त्याने खूप जास्त धावा केल्या असत्या. रिकी पाँटिंग, ब्रायन लारा यांच्यासह सचिन तेंडुलकर महान खेळाडू आहे. वसीम अक्रम आणि शेन वॉर्न हे देखील याच श्रेणीत येतात. विराट कोहली (Virat Kohli) जरी आमच्या काळात खेळला असता तरी त्याने त्याच पद्धतीने धावा केल्या असत्या, असं अख्तर (Shoaib Akhtar) म्हणतो. 

विराट कोहलीने (Virat Kohli) आजवर ज्या पद्धतीने धावा केल्या आहेत, त्याच पद्धतीने त्याला भविष्यातही धावा कराव्या लागतील. तो या काळातील महान फलंदाज आहे. तुम्ही दोन्ही युगांची तुलना करू शकत नाही. कोहलीने 100 शतक मारावीत, अशी माझी इच्छा आहे, असं शोएब (Shoaib Akhtar) उत्तर म्हणाला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरच्या नावावर सर्वाधिक 100 शतके आहेत. या विक्रमाच्या सर्वात जवळ विराट कोहली आहे. विराटच्या नावावर तिन्ही फॉरमॅटसह एकूण 80 शतके आहेत. क्रिकेटच्या देवाच्या या विक्रमाची बरोबरी करण्यासाठी विराटला आणखी 20 शतके ठोकावी लागणार आहेत. विराट कोहलीची फिटनेस पाहता तो आणखी 4 वर्ष क्रिकेट खेळू शकतो. मात्र, बीसीसीआय या महान फलंदाजांवर कितपत डाव लावणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, विराटने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात जेव्हा सचिनचा विक्रम मोडला, तेव्हा सचिनने उभं राहून विराटचं अभिनंदन केलं होतं. त्यावेळी सचिनने एक इच्छा व्यक्त केली होती. विराट कोहलीने माझा रेकॉर्ड मोडला तर मला आनंद होईल, अशी भावना क्रिकेटच्या देवाने व्यक्त केली होती.

Related posts