Winter Car Care Tips car care tips to know vehicle health check these things

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Winter Car Care Tips : देशात बहुतांश ठिकाणी तापमान (winter season) अतिशय कमी आहे. त्यात अनेकजण प्रवासदेखील करताना दिसत आहे. येत्या आठवड्यात लॉंग विकेंड (Car Care) येणार आहे. त्यासाठी तुम्ही जर काही प्लॅन करत  असाल तर आधी तुमच्या गाडीची काळजी घेणं गरजेचं असेल. जर तुम्ही तुमच्या कारने प्रवास करायचा विचार करत असाल तर तुम्ही खालील ट्रिक वापरुन गाडीची काळजी नक्की घ्या.

बॅटरी चेकअप 

या वातावरणात कमी तापमानाचा सर्वाधिक परिणाम वाहनांच्या बॅटरीवर होतो. त्यामुळे सर्वप्रथम आपल्या कारची बॅटरी पाहावी. कुठेही लीक होत नाही, त्यासाठी गाडी स्टार्ट करा आणि बघा.  8-10 दिवसांपेक्षा जास्त काळ एकाच जागेवर उभी असेल तर आधी काही अंतर गाडी चालवून बघा आणि बॅटरीचा अंदाज घ्या. 

इंजिन ऑईल तपासा

दुसरी गोष्ट जी तुमच्या कारला चालवण्यास मदत करते ती म्हणजे इंजिन ऑईल. याच्या मदतीने गाडी चांगली परफॉर्मन्स देते. जर ते जुने झाले असेल तर ते बदलून टाका. तसेच त्याचे प्रमाण तपासावे. जेव्हा ते कमी असेल तेव्हा आपण टॉपअप देखील करू शकता. 

टायरची हवा चेक करा

हिवाळ्यात तापमान चढ-उतार होत असल्याने टायरचा दाबही वर-खाली जाऊ शकतो. ते तपासून पहात राहा. जेणेकरून चांगल्या मायलेजबरोबरच टायर लवकर खराब होण्यापासून ही वाचतील. 

लाईट्स चेक करा

हिवाळ्यात खराब लाईट्स घेऊन गाडी चालवण्याचा विचारही करणं व्यर्थ आहे. मात्र, कोणत्याही हवामानात रात्रीच्या वेळी गाडीचे लाईट्स नीट असणं गरजेचं आहे पण धुक्यामुळे हिवाळ्यात दिवसाही त्यांची गरज भासते. त्यामुळे लाईट्स व्यवस्थित काम करत आहेत की नाही हेही तपासा. 

वायपर/विंडशील्ड-

हिवाळ्यात ही दोन्ही अतिशय उपयुक्त आहेत, जी धुक्यात काच साफ करण्याचे काम करतात. तेही योग्य स्थितीत असणे गरजेचे आहे. 

गाडी चालवताना सावध राहा…

आपली कार सुरक्षित ठिकाणी पार्क करा ़ धुक्यात गाडी चालवत असताना नेहमी सावध राहा. कारण कमी दिसत असल्यामुळे तुम्हाला अचानक कोणत्याही गोष्टीचा सामना करावा लागू शकतो आणि तुम्हाला सावरायला फारसा वेळ मिळणार नाही. त्यामुळे मोबाईल वापरू नका, संगीत ऐकू नका, जेणेकरून मूड डायव्हर्जन टाळता येईल. गाडीच्या खिडक्या थोड्या खाली ठेवल्या तर बरे होईल. जेणेकरून बाहेरचा आवाजही ऐकू येईल. 

इतर महत्वाची बातमी-

How to Apply Passport process : 4-5 हजार नाही तर फक्त 1500 रुपयांत काढा पासपोर्ट, घरबसल्या कसा करावा अर्ज?

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts